Poultry Market : श्रावणात पहिल्यांदाच चिकनचे दर तेजीत

Chicken Market Rate : यंदा मात्र इतिहासात पहिल्यांदाच श्रावणात चिकनची मागणी वाढली आहे. दरातही वाढ झाली आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on: 
Updated on: 

Nagpur News : श्रावण महिन्यात मागणी कमी होत चिकनच्या दरात घसरणीचा अनुभव नेहमीचाच. यंदा मात्र इतिहासात पहिल्यांदाच श्रावणात चिकनची मागणी वाढली आहे. दरातही वाढ झाली आहे. यापूर्वी ६० रुपये किलो असलेला जिवंत कोंबडीचा दर आता ११६ रुपयांवर पोचला आहे.

Poultry
Poultry Diseases : कोंबड्यांतील रोगनिदानामध्ये शवविच्छेदन महत्त्वाचे...

राज्यात मोठ्या प्रमाणावर करारावरील पोल्ट्री व्यवसाय केला जातो. त्यामध्ये एक दिवसाच्या पक्षी पुरवठ्यावर कंपन्यांचे नियंत्रण राहते. परिणामी चिकनची किरकोळ बाजारपेठही कंपन्यांव्दारे संचालित असल्याने दरात चढउतार त्यांच्या माध्यमातून होतात. याला पायबंद बसावा, यासाठी पशुपालक सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

Poultry
Poultry Industry : पोल्ट्री व्यावसायिक पुकारणार बंद

त्याच्याच परिणामी कंपन्यांनी काही अंशी धोरणात बदलासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत सण, उत्सवात मागणी कमी होईल ही शक्‍यता लक्षात घेत ‘हॅच हॉलिडे’ पाळला जातो. त्यामध्ये अंडी उत्पादन नियंत्रित ठेवत त्यानंतरच्या काळात एक दिवसाच्या पिल्लांचे कमी उत्पादन घेतले जाते. परिणामी पुरवठा आणि मागणी संतुलित राहते.

सण, उत्सवाच्या साधारणतः ६० दिवसांपूर्वी ‘हॅच हॉलिडे पाळण्यावर भर राहतो. गेली काही वर्ष यात खंड असला तरी आता दबावामुळे यावर भर दिला गेला आहे. परिणामी यंदा श्रावणात चिकनची मागणी आणि पुरवठा यात तफावत राहिली. त्यामुळे दर तेजीत आले आहेत.

दिल्ली, हरियाना, मध्यप्रदेशातून मागणी

चिकनचा उचल घाऊक दर शुक्रवारी (ता. १) ११६ रुपये किलो प्रमाणे होता. दरवर्षी श्रावण महिन्यात हा दर ६० रुपयांपर्यंत राहत होता. दर कमी असल्याने शेतकरी एक दिवसाच्या पिल्लांचा उठाव कमी करीत होते.

त्यामुळे पिल्लांचा दर सहा रुपयांपर्यंत होता. आता हा दर ४८ रुपयांवर पोचला आहे. दिल्ली, हरियाना, मध्यप्रदेश या भागात तुलनेत मागणी अधिक आहे. दर १४० रुपयांवर पोचले आहेत. या राज्यांमध्ये श्रावण महिना संपल्याने मागणी वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

एक दिवसाच्या पक्ष्यांचा पुरवठा २५ ते ३० टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. दरात तेजी आली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने ब्रॉयलरच्या दरात पहिल्यांदाच श्रावण महिन्यातही तेजी अनुभवली जात आहे. विदर्भात एका दिवसाच्या पक्ष्यांना मागणी वाढल्याने त्याचे दर ४७ रुपये प्रतिनगावर आहेत.
- गजानन वानखेडे, संचालक, व्यंकटेश हॅचरीज ऍण्ड फूड प्रा. लि. नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com