Chicken Rate : मागणी घटल्याने चिकनचे दर कमी झाले

देशभरात सध्या लम्पी स्कीन आजारानं थैमान घातलंय. गोवंश या आजाराच्या विळख्यात आडकलंय. राज्यात आत्तापर्यंत शेकडो गायी आणि बैलांचा या आजाराने मृत्यू झाला. मात्र संबंध नसतानाही केवळ अफवांमुळं मटण आणि दुधाच्या बाजारावरही झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
Poultry
PoultryAgrowon

पुणेः राज्यात गोवंशामध्ये लम्पी आजाराचा (Lumpy Skin Outbreak) फैलाव वाढलाय. नेमकं याच काळात पोल्ट्रीच्या जिवंत पक्ष्याचे दर (Live Bird Rate) कमी झाले. मग लम्पी आजारामुळं (Lumpy Outbreak) दर कमी झाल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या. त्यामुळं कोरोनाकाळात अफवेमुळं उद्ध्वस्त झालेल्या पोल्ट्री उत्पादकांना (Poultry Farmer) धास्ती बसली. मात्र जिवंत पक्ष्याचे दर लम्पीमुळे नाही तर मागणी घटल्याने कमी झाले, असे जाणकारांनी सांगितले.

Poultry
Dairy, Poultry : दूध, पोल्ट्री हे शेतीपूरक व्यवसायच झाले सुबत्तेचे कारण

देशभरात सध्या लम्पी स्कीन आजारानं थैमान घातलंय. गोवंश या आजाराच्या विळख्यात आडकलंय. राज्यात आत्तापर्यंत शेकडो गायी आणि बैलांचा या आजाराने मृत्यू झाला. मात्र संबंध नसतानाही केवळ अफवांमुळं मटण आणि दुधाच्या बाजारावरही झाल्याचं जाणकारांनी सांगितलं. हा आजार शेळ्या आणि मेंढ्याना होत नाही, तसचं लम्पी झालेल्या गायीचं दूध खाण्यापासून कोणताही अपाय होत नाही, असं पशुसंवर्धन विभागानं स्पष्ट केलंय. मात्र तरीही अफवांमुळं काही प्रमाणात का होईना मार्केटवर परिमाम होतोय.

तशीच अफवा पोल्ट्रीच्या बाबतीत पसरली. राज्यात मागील एक महिन्यात जिवंत पक्ष्याचा दर म्हणजेच पोल्ट्री उत्पादकांना मिळणार दर प्रतिकिलो १३० रुपयांपर्यंत पोचले होते. मात्र त्यात आता घट झाली. जिवंत पक्ष्यांचा दर आता ९७ रुपयांपर्यंत कमी झाला. लम्पी स्कीन आजारामुळं हा दर कमी झाल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत. तसचं पोल्ट्री उत्पादकही हेच मानत आहेत. पण जाणकारांच्या मते लम्पी स्कीन आजार आणि पोल्ट्रीचा काही संबंध नाही.

Poultry
Poultry MSP : पोल्ट्री उद्योगाला हवा हमीभाव

दर का कमी झाले?

गोवंशामध्ये लम्पी आजार पसरल्यानंतर बाजारात मटणाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं चिकनला मागणी वाढली होती. नेमकं त्याच काळात पोल्ट्रीचा पुरवठा मर्यादीत होता. त्यामुळं जिवंत पक्ष्याचे दर सुधारले होते. मात्र पतृपक्ष आणि नवरात्रीमध्ये मासांहार टाळला जातो. परिणामी चिकन आणि अंडीला मागणी कमी झाली. त्यामुळं जिवंत पक्ष्याचे दर कमी झाले. या काळात दरवर्षी दर कमी होतात. त्याचा लम्पी आजाराशी संबंध नाही

अफवेला बळी पडू नये !

जिवंत पक्ष्याचे दर मागणी घटल्याने कमी झाल्याचे वास्तव आहे. पण अफवा पसरुन गैरसमज केला जात आहे. त्याला उत्पादकांनी किंवा ग्राहकांनी बळू पडू नये. उलट लम्पी आजारामुळे मटणाला मागणी कमी झाल्यानंतर चिकना मागणी वाढली होती, असं सांगत नवरात्री संपल्यानंतर जिवंत पक्ष्याचे दर आणखी सुधारू शकतात, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

मागील काही दिवसांपासून जिवंत पक्ष्याचे दर कमी झाले ही खरं आहे. पण ते लम्पीमुळं नाही तर पतृपक्ष आणि नवरात्रीमुळं चिकनला मागणी घटल्याने कमी झाले. या दरवर्षी चिकनचे दर कमी होत असतात. लम्पीमुळं दर पडले ही केवळ अफवा आहे. लम्पी आणि पोल्ट्रीचा संबंध नाही.
वसंतकुसार शेट्टी, अध्यक्ष, पोल्ट्री फार्मर्स अॅण्ड ब्रीडर्स असोसिएशन
लम्पीमुळं जिवंत पक्षाचे दर कमी झाल्याच्या अफवा सोशल मिडीयावर सुरु आहेत. असाच प्रकार कोरोना काळातही झाला होता. पोल्ट्री उत्पादकांनी या अफवांवर विश्वास ठेऊ नये. नवरात्री आणि पितृपक्षामुळे रिटेलमधून मागणी कमी झाली. त्यामुळे दर नरमले आहेत.
अनिल फडके, पोल्ट्री उद्योजक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com