Chana Market Update : हरभऱ्याने बिघडविले अर्थचक्र

खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हिंमत ठेवत हरभरा पेरणी केली.
Chana Market
Chana Market Agrowon
Published on
Updated on

Amravati Chana Market : यावर्षी रब्बी हंगामात अमरावती जिल्ह्यात हेक्टरी १५ क्विंटल उत्पादनाची (Chana Production) सरासरी काढण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना यापेक्षा कमी-अधिक सरासरी आली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना हरभरा उत्पादनातून एकरी १२ हजारांचे उत्पन्न झाले आहे. खर्च १६ हजार रुपये (Chana Rate) आला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हिंमत ठेवत हरभरा पेरणी केली. अमरावती जिल्ह्यात १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली.

त्यावर मध्यंतरीच्या काळात उत्पादनापूर्वी मर व घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या औषधांची फवारणी करावी लागली.

Chana Market
Chana Market: हरभऱ्याला आज, २९ मार्चला कोणत्या पाच बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव?

त्यामुळे बियाण्यांसह नांगरणी, डवरणी, खते, खुरपणी व सोंगणी असा मोठा खर्च करावा लागला. या सर्वांचा एकूण खर्च एकरी सोळा हजार ६०० रुपये झाला. उत्पादनाची सरासरी एकरी सहा क्विंटल असल्याचे कृषी विभागाने काढलेल्या उत्पादन सरासरीत म्हटले आहे.

शासनाने हरभऱ्याला ५,३३५ रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. तर खुल्या बाजारात हाच दर ४४०० ते ४८०० रुपये आहे. या दराने एकरी सहा क्विंटल सरासरी असलेल्या शेतकऱ्यांना २८ हजार ८०० रुपये उत्पन्न झाले आहे.

Chana Market
Chana Procurement in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर १३ हजार क्विंटल हरभरा खरेदी

उत्पादनासाठी लागलेला खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांच्या खिशात एकरी १२ हजार ७०० रुपये आले आहेत. साधारणतः हरभरा उत्पादनासाठी तीन महिन्यांचा (११० दिवस) कालावधी लागतो.

उत्पादनासाठी लागलेला खर्च व नंतर झालेली मिळकत याचा ताळमेळ बघितला तर ४ हजार २३३ रुपये प्रतिमाह मेहनताना शेतकऱ्याला मिळाला आहे.

हरभऱ्याचा एकरी खर्च

नांगरणी : २,०००

बियाणे : ३०००

लागवड : ६००

फवारणी : ४५००

खुरपणी (निंदणी) : १,०००

डवरणी : १,०००

सोंगणी : २,०००

वाहतूक खर्च : ६००

एकूण : १६,१००

महागडे बियाणे, खते व फवारणीचे औषध देऊनही अपेक्षित सरासरी मिळाली नाही. यंदा हरभरा फुलोऱ्यावर असताना दवाळ गेल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे दरवर्षी मिळणाऱ्या सरासरीत घट येऊन ती तीन ते चार क्विंटलवर आली. उत्पादनाचा खर्च व मेहनत निघाली नाही.
- राजेंद्र रोडगे, शेतकरी, कानफोडी, जि. अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com