Masoor Import Duty : मसूरच्या शुल्कमुक्त आयातीला केंद्राची एक वर्षाची मुदतवाढ

Pulses Market : मसूरची आयात वाढावी यासाठी केंद्र सरकारने ३० टक्के शुल्क काढून शुल्कमुक्त आयातीचे धोरण राबवले आहे.
Masoor
Masoor Agrowon
Published on
Updated on

Pune News : मसूरची आयात वाढावी यासाठी केंद्र सरकारने ३० टक्के शुल्क काढून शुल्कमुक्त आयातीचे धोरण राबवले आहे. केंद्र सरकारने पुन्हा या धोरणाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली. मार्च २०२५ पर्यंत मसूर आयातीवर कोणतेही शुल्क नसेल. यामुळे तूर, हरभरा आणि देशातील मसूरच्या भावावर परिणाम होत आहे.

देशात उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने आयातीचा सपाटा लावला. उत्पादन घटल्याच्या काळात देशातच उत्पादन वाढून पुरवठा कसा वाढेल यावर केंद्र सरकारने भर द्यायला हवा होता, पण सरकार आयातीसारख्या तात्पुरत्या उपायावर जोर देत असल्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Masoor
Rabi Sowing : रब्बी पेरण्यांत ज्वारी, मोहरी, मसूर आघाडीवर

एरवी मसूर आयातीवर ३० टक्के शुल्क असायचे. पण सरकारने मार्च २०२४ पर्यंत हे शुल्क काढून शुल्कमुक्त आयातीचे धोरण राबविले होते. पण ही मुदत संपायच्या आतच शुल्कमुक्त आयातीला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देत मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.

देशात मसूर आयात वाढल्याचा दबाव इतर कडधान्याच्या दरावर येत आहे. मसूर आयातवाढीने देशात मसूरचे भाव कमी झाले. परिणामी मसूरला मागणी वाढली. यामुळे तुरीच्या भावावरही काहीसा दबाव आला. तसेच देशातील मसूर उत्पादकांना मोठा फटका बसला. म्हणजेच मसूर आयात देशातील कडधान्य उत्पादकांना अडचणीची ठरत आहे.

Masoor
Masur Import : ऑस्ट्रेलियाची विक्रमी मसूर निर्यात; भारत ठरला मोठा ग्राहक

आयातीचा वाढता आलेख

११.४८ लाख टन

२०२३-२४ (एप्रिल ते नोव्हेंबर)

८.५८ लाख टन

२०२२-२३

मसूर आयातीचा परिणाम

- शुल्क काढल्याने मसूर आयातीत ३४ टक्के वाढ

- आयातवाढल्याने मसूरचे भाव कमी झाले- देशातील मसूर उत्पादक आर्थिक संकटात

- तूर डाळीची १५ ते २० टक्के मागणी मसूरकडे वळाली

- मसूरच्या कमी भावाचा काही प्रमाणात तुरीच्या भावावरही परिणाम होतो

- मसूरची कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून होते आयात

- आयातदारांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागतच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com