Masur Import : ऑस्ट्रेलियाची विक्रमी मसूर निर्यात; भारत ठरला मोठा ग्राहक

Masur Rate : भारतात सध्या तुरीसह इतर कडधान्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे भारताने मसूर आयात वाढवली, असे अभ्यासकांनी सांगितले.
Lentil
LentilAgrowon

Import Export News : ऑस्ट्रेलिया जगातील अग्रेसर मसूर निर्यातदार देश आहे. ऑस्ट्रेलियाने नुकत्याच संपलेल्या विपणन वर्षात विक्रमी मसूर निर्यात केली. एकूण निर्यात १७ लाख ४५ हजार टन होती. त्यापैकी ४७ टक्के म्हणजेच सव्वा आठ लाख टन निर्यात एकट्या भारताला झाली. भारतात सध्या तुरीसह इतर कडधान्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे भारताने मसूर आयात वाढवली, असे अभ्यासकांनी सांगितले.

Lentil
देशात यंदा विक्रमी मसूर आयात होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियात मसूरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. २०२२-२३ च्या हंगामात ऑस्ट्रेलियात १६ लाख ८० हजार टनांचे उत्पादन झाल्याचे येथील संस्था अबारेसने म्हटले आहे. हे उत्पादन विक्रमी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. पण निर्यातीचा आकडा उत्पादनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील मसूर उत्पादन गेल्या हंगामात २० लाख टनांच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज आहे.

Lentil
Rabi Sowing : रब्बीत हरभऱ्याला पर्याय राजमा, मसूर, मोहरी

भारतात तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीचा बाजारभाव मागील काही महिन्यांपासून १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. तुरीला मसूरचा पर्याय काही प्रमाणात आहे. संपूर्ण मागणी मसूरकडे वळत नाही. पण तुरीला काही प्रमाणात पर्याय मसूर ठरत असते. यामुळेच केंद्र सरकारने मसूर आयातीवर जोर दिला. भारताला मसूरचा सर्वात मोठा पुरठादार ऑस्ट्रेलिया आहे.

चालू हंगामात म्हणजेच २०२३-२४ या वर्षात मसूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. अबारेस या संस्थेच्या मते, देशातील उत्पादन १२ लाख ३० हजार टनांच्या दरम्यान राहील. तर उद्योगांच्या मते, १४ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान उत्पादन राहील. म्हणजेच यंदा उत्पादन कमी राहणार आहे. परिणामी ऑस्ट्रेलियाची मसूर निर्यात कमी राहील, असा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाने नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ च्या विपणन वर्षात म्हणजेच ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात आतापर्यंतची विक्रमी मसूर निर्यात केली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात १७.४५ हजार टनांची निर्यात वेगवेगळ्या देशांना केली. यापैकी ४७ टक्के माल भारतात आला. भारताने या वर्षात ८ लाख २१ हजार टनांची आयात केली.

भारतानंतर बांगलादेश सर्वात मोठा खरेदीदार ठरला. बांगलादेशने या विपणन वर्षात २ लाख ६१ हजार टनांची आयात केली. तर युएईने १ लाख ७८ हजार टन, श्रीलंकेने १ लाख ६९ हजार टन ऑस्ट्रेलियातून मसूर आयात केली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com