Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेपंधरा लाख क्विंटल कापूस खरेदी

Cotton Market : सीसीआय तसेच खासगी कापूस खरेदीचे दर कमी झाल्यामुळे दरवाढीच्या आशेने आजवर कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
CCI Cotton Procurement
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) खरेदी हंगामात सोमवार (ता. १०) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांमधील सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ लि.) ११ केंद्रांवर १० लाख ८३ हजार ८६४ क्विंटल आणि खासगी ४ लाख ८९ हजार ३९१ क्विंटल कापूस खरेदी झाली.

या दोन जिल्ह्यांत सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १५ लाख ४९ हजार ७७५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआय तसेच खासगी कापूस खरेदीचे दर कमी झाल्यामुळे दरवाढीच्या आशेने आजवर कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

सीसीआयकडून सोमवार (ता. १०) पर्यंत राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ११ ठिकाणच्या २० जिनिंग कारखान्यांमध्ये १० लाख ८३ हजार ८६४ क्विंटल कापूस खरेदी झाली.

CCI Cotton Procurement
CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी प्रक्रियेत रुई उताऱ्यात हेराफेरी

त्यात परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील १७ जिनिंग कारखान्यांमध्ये ९ लाख ४१ हजार ९६१ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ केंद्रांवर १ लाख ४१ हजार ९०३ क्विंटल कापूस खरेदी झाली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून ४ लाख ८९ हजार ३९१ क्विंटल कापूस खरेदी झाली.

त्यात परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ४ लाख ५३ हजार ४२९ क्विंटल कापूस खरेदी झाली, तर हिंगोली जिल्ह्यात ५ जिनिंग कारखान्यांमध्ये ३५ हजार ९६२ क्विंटल कापूस खरेदी झाली अशी माहिती कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

CCI Cotton Procurement
Cotton Procurement: राज्यातील १२४ केंद्रांवर १.४ कोटी क्विंटल कापूस खरेदी!

सीसीआयकडून किमान आधारभूत किंमत दराने, परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार कापूस खरेदी केली जात आहे. मागील काही आठवड्यापासून सीसीआयचे खरेदी दर कमी झाले आहेत. मागील ठवड्यात प्रतिक्विंटल ६५०० ते ७४७१ रुपये दराने खरेदी करण्यात आली. खुल्या बाजारातील कापसाच्या दरात वाढ होईल ही अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती. खुल्या बाजारातील दरात वाढ झाली नाही.

परभणी-हिंगोली जिल्हे कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

सीसीआयची खरेदी

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी २ ५१३४७ ७१०० ते ७४००

जिंतूर १ २२६६०२ ७१०० ते ७४२१

बोरी २ १४९५९६ ६५०० ते ७१००

सेलू ५ ९४७४४ ७१७२ ते ७४७१

मानवत ३ २५७००२ ७०४० ते ७२०५

पाथरी १ २७६६२ ७१७२ ते ७४२१

गंगाखेड २ ८४७११ ७१२४ ते ७४२१

ताडकळस १ ५०२४८ ७२४६ ते ७४२१

हिंगोली १ ४४१५८ ७१२४ ते ७४२१

वसमत १ २३३८० ७१५० ते७४७१

जवळा बाजार १ ७३९०५ ७१७० ते ७४४१

खासगी कापूस खरेदी

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी ४ ८३६५८ ६८०० ते ७३४५

जिंतूर ४ १३३०० ६७०० ते ७१००

बोरी १ ४०५० ६९०० ते ७१००

सेलू ६ ४८४८३ ७१६० ते ७३३५

मानवत १३ १७०२९२ ७१०० ते ७२५०

पाथरी २ १७६८९ ६८५० ते ७०५०

सोनपेठ १ ३२३५४ ७१५० ते ७३००

गंगाखेड ६ ७२४६५ ७१००ते ७३५०

ताडकळस २ १११३४ ७१०० ते ७३५०

हिंगोली ४ ३२८९० ६८०० ते ७१५०

जवळा बाजार १ ३०७२ ६९०० ते ७१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com