Carrot Price: गाजराचे दर उंचावले! सरासरी २००० रुपये क्‍विंटलवर पोहोचले

Carrot Market Update: किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची घाऊक विक्री २० ते २५ रुपये किलोप्रमाणे होत आहे. महागाव तालुक्‍यातील माडकिन्ही गावात गाजर लागवड होते.
Carrot
CarrotAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News: किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची घाऊक विक्री २० ते २५ रुपये किलोप्रमाणे होत आहे. महागाव तालुक्‍यातील माडकिन्ही गावात गाजर लागवड होते. या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दर काहीसे समाधानकारक असल्याचे सांगितले.

तालुक्‍यातील माडकिन्ही गावात १० ते १२ एकरांवर गाजर लागवड होते. ऑक्‍टोबर महिन्यात लागवड करून सक्रांतीपूर्वी बाजारात आवक होईल, असा उद्देश असतो. परंतु यंदा सोयाबीन काढणीच्यावेळी व नंतर देखील पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे गाजर लागवडीचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला.

परिणामी सक्रांतीऐवजी आता गाजर काढणीस येत असल्याची माहिती शेतकरी माधव कांदे यांनी दिली. त्यामुळे वाढीव दराचा फायदा यंदा मिळू शकला नाही. सक्रांतीच्यावेळी मागणी वाढती असल्याने ३० ते ३५ रुपये किलोचा दर मिळतो. सध्या गाजराची विक्री २० ते २५ रुपये किलोप्रमाणे होत आहे.

Carrot
Carrot Farming : गाजराच्या शेतीने बदलले बक्षीहिप्परगेचे अर्थकारण

गेल्या वर्षी याच कालावधीत गाजराचे दर अवघे १५ रुपये किलो असे होते. साडेतीन महिने कालावधीचे पीक आहे. यंदा मार्चपर्यंत याची उत्पादकता होईल. एका एकरातून सरासरी १५० ते २०० क्‍विंटलची उत्पादकता होते.

बाजारात पूर्वी ५० किलोच्या पोत्यामध्ये माल पाठविण्यावर भर होता. आता व्यापाऱ्यांकडून २६ ते २७ किलोच्या प्लॅस्टीक पिशवीच्या पॅकिंगमध्ये मागणी राहते. त्यानुसार माल पॅकिंग करून पाठविला जातो. मागणीत वाढ झाल्यास यापुढील काळात दरात काहीशी तेजी राहील, असा अंदाज शेतकरी माधव कांदे यांनी व्यक्‍त केला आहे.

Carrot
Carrot Grass : स्थलांतर करायला लावणारे गाजर गवत

अमरावती बाजारात गाजाराची नियमित १५० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक होत आहे. या बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजराला १६०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. नागपूरच्या कळमना बाजाराचा विचार करता या ठिकाणच्या गाजराची आवक ९०० क्‍विंटलवर पोहचली आहे.

नागपूर बाजार समितीत आवक होणाऱ्या गाजराला एक ते १३ जानेवारी या कालावधीत १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. आता मात्र मागणीत घट झाल्याने गाजराचे दर १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलवर आले आहेत. आवक सुध्दा पूर्वीच्या ९०० क्‍विंटलवरून १०० क्‍विंटलने कमी होत ८०० क्‍विंटलवर आली आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

दिग्रस, पुसद, आर्णी, माहूर, वाई, मांडवी या गावांतील बाजारात गाजराची विक्री होते. पाच ते सहा शेतकऱ्यांची लागवड राहते. सरासरी दीड ते दोन एकर असे सरासरी क्षेत्र प्रत्येक शेतकऱ्यांचे आहे. सक्रांतीपूर्वी गाजर बाजारात आल्यास सणाच्या निमित्ताने मागणी राहते, दर तेजीत राहतात. यंदा हंगाम हुकला तरी दर काहीसे समाधानकारक आहेत.
माधव कांदे, शेतकरी, मांडकिन्ही, ता. महागाव, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com