Sugar Export : साखर निर्यातीत ब्राझीलची घोडदौड सुरूच

Sugar Industry : ब्राझीलने साखर निर्यातीत घोडदौड सुरूच ठेवली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये तब्बल ३० लाख टन साखरेची निर्यात विविध देशांना केली आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

Kolhapur News : ब्राझीलने साखर निर्यातीत घोडदौड सुरूच ठेवली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये तब्बल ३० लाख टन साखरेची निर्यात विविध देशांना केली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही निर्यात तिप्पट आहे. फेब्रुवारी २०२३ च्या तुलनेच यंदा फेब्रुवारीत निर्यात १६२ टक्क्यांनी वाढली आहे.

ब्राझीलने गेल्‍या हंगामात ४०० लाख टनांचा साखर उत्पादनाचा टप्पा ओलांडला. एकूण निर्यातही ३०० लाख टनांच्या आसपास झाली आहे. ब्राझीलने साखर उत्पादन व निर्यातीत जगातील सर्वच देशांना मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे.

भारताला जादा दर मिळविण्याची संधी असूनही केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी आणली. याचा थेट फायदा ब्राझीलला यंदा झाला. याचबरोबर भारताचे खरेदीदार देशही ब्राझीलने परत आपल्याकडे वळविल्याने जागतिक बाजारात भारतीय साखरेचा वरचष्मा संपला आहे.

Sugar Export
Sugar Factory : पुणे विभागात चार साखर कारखान्यांचे धुराडे बंद

ब्राझील वगळता अन्य कोणत्याच देशात निर्यातीइतपत साखरेचे उत्पादन झाले नाही. भारतासारख्या देशांनी उत्पादित साखरेसाठी स्‍थानिक बाजापपेठेला प्राधान्य दिल्याने यंदा भारतीय साखर आंतराष्ट्रीय बाजारात जाऊ शकली नाही. याचा फायदा ब्राझीलने उठविल्‍याचे या हंगामात दिसले. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये मोठा दुष्काळ पडला. याचा नकारत्मक परिणाम या देशाला सहन करावा लागला.

भारताने मुक्त हस्‍ते निर्यातीला परवानगी दिली. आंतराष्ट्रीय बाजारात दोन वर्षांपूर्वी पहिल्‍यांदाच स्थानिक बाजारापेक्षा जादा दर मिळाले याचा फायदा भारतीय साखर उद्योगाला झाला. दोन वर्षांपूर्वी १०० लाख टनांहून अधिक साखर भारताबाहेर गेली. पण यानंतर कमी उत्पादनाचा दाखला देत भारतातील साखर निर्यातीवर बंदी आणली. याचवेळी चांगल्या पावसामुळे ब्राझीलचे साखर उत्पादन वाढले.

Sugar Export
Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

ब्राझीलच्या हंगामाच्या पहिल्‍या महिन्यापासून गेल्या वर्षीच्‍या तुलनेत तीस टक्क्यांनी उत्पादन वाढ झाली. हेच प्रमाण हंगाम संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत कायम रहिले. ‘एल निनो’मुळे साखर उत्पादक अन्य देशांत उत्पादन कमी राहिले.

यामुळे साखर उत्पादन कमी होणार अशी हवा तयार झाली. दरातही मोठी वाढ झालीय याचा फायदा ब्राझीलने उठविला. पहिल्या महिन्‍यापासून साखर निर्यात करण्यास सुरुवात झाली. हंगामाच्या मध्यात तर जहाजे नसल्याने लाखो टन साखर ब्राझीलच्या बंदरावर पडून असल्याचेही पाहायला मिळाले.

उच्चांकी प्रमाणात निर्यात अपेक्षित

सध्या तेथील हंगाम संपला असला तरी साखरेची मागणी कायम असल्‍याने निर्यातीची प्रक्रिया अखंड सुरू आहे. यामुळे उच्चांकी प्रमाणात निर्यात अपेक्षित असल्याचे चित्र सध्या तरी आहे. सध्या केंद्र सरकारने मात्र निर्यातीला परवानगीबाबत भाष्य केले नाही. पुढील वर्षीही निर्यातीला कितपत परवानगी देईल याबाबत शाश्‍वती नाही. यामुळे येणाऱ्या हंगामातही ब्राझीलच्या साखरेचे वर्चस्व कायम राहील, अशी चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com