Beetle Leaf Rate : चेन्नईतील खाऊची पाने राज्यातील बाजारांत दाखल

Beetle Leaf : चेन्नईतील खाऊची पाने राज्यातील विविध पान बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. त्यामुळे स्थानिक पानमळ्यांतील पानांची मागणी कमी आहे.
Beetle Leaf
Beetle Leaf Agrowon

Sangli News : चेन्नईतील खाऊची पाने राज्यातील विविध पान बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. त्यामुळे स्थानिक पानमळ्यांतील पानांची मागणी कमी आहे. उठाव कमी होत असल्याने पानांच्या दरात घट झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हंगामाच्या प्रारंभाच्या प्रतिडागाला (एका डागात १२ हजार पाने) दोन ते तीन हजार रुपयांनी दर कमी मिळत आहेत. त्यामुळे पान उत्पादक संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात पानमळे अजूनही टिकून आहेत. जानेवारीत पानमळ्यात उतरण केली जाते. यंदा हंगामातील उतरण पूर्ण झाली आहे. एप्रिलपासून नवीन पानांची खुडणी सुरू होते. मुळात वर्षभर पानांचा खुडा होतो. सध्या या भागात म्हैसाळचे पाणी कालव्याला असल्याने पाण्याची टंचाई नाही. त्यामुळे पानमळ्यांची स्थिती चांगली आहे. मळे फुलले आहेत. गतवर्षी पानांना एका डागाला ७ हजारांपासून १० हजारांपर्यंत असा दर मिळाला.

Beetle Leaf
Beetle Leaf : खाऊच्या पानांच्या अस्थिर दराने उत्पादक संकटात

दरम्यान, यंदाच्या हंगामात पानमळ्यात पानांची खुड्याची कामे सुरू झाली आहेत. सध्या उतरण केल्याने पानांचे उत्पादन कमी असते. बाजारपेठेत मागणी असल्याने दरही चांगले मिळतात. मात्र चेन्नई येथील पाने राज्यातील विविध पानांच्या बाजारात दाखल झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे.

Beetle Leaf
Beetle Leaf : खाऊच्या पानांची लाली उतरलेलीच

चेन्नईतील पाने मे महिन्यापर्यंत बाजारात विक्रीसाठी येतात. गतवर्षी चेन्नईतील पानेही बाजारात विक्रीस आली होती. परंतु आवक कमी असल्याने या भागातील पानांना मागणी असून उठावही चांगला झाला होता. त्यामुळे दरही चांगले मिळाले होते.

कळी पानांना डागाला ६ हजार ते १० हजार रुपये

यंदा सांगली जिल्ह्यातील पानांच्या खुड्याचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या नागवेलींना पानांची संख्या कमी असते. त्यानुसार शेतकरी खुड्याचे नियोजन करतो. त्यातच चेन्नईतील पानांची स्थानिक बाजारात आवक सुरू होते.

परंतु या भागातील पानांच्या आवकेत वाढ झाली आहे. मात्र तरीही पानांचा उठाव म्हणावा तितका होत नाही. त्यामुळे दरात घट झाली आहे. सध्या कळी पानांना एका डागाला ६ हजार ते १० हजार, तर फाफडा पानाला एका डागाला ५ हजार ते ८ हजार रुपये असा दर मिळत आहे.

म्हैसाळच्या आवर्तनामुळे कालव्यांना पाणी असल्याने पानमळे चांगले फुलले आहेत. मात्र चेन्नईतील पानांची आवक वाढली असून बाजारपेठेत मागणी कमी आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com