Chana Rate Update : जागतिक पातळीवर मागील सात महिन्यांपासून काबुली हरभऱ्याची टंचाई (Chana Shortage) आहे. त्यातच भारत आणि मेक्सिकोत यंदा उत्पादन घटले. काही देशांनी लागवड वाढवली तरी पुढील किमान सहा महिने काबुली हरभऱ्याचा तुटवडा भासेल. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर तेजीत (Chana Rate) राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
भारत जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक आणि उपभोक्ता देश आहे. भारतात हरभरा, काबुली हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर ही महत्वाची कडधान्ये आहेत. मागील हंगामापासून देशी हरभरा दर दबावात होते. पण काबुली हरभऱ्याने उच्चांकी दराची टप्पा गाठला होता.
त्यामुळे चालू हंगामात काबुली हरभरा लागवडीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. सहाजिकच लागवड वाढल्याने बंपर उत्पादन होईल, असा अंदाज होता. यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादन ४ लाख ५० हजार टनांवर पोचेल, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांकडून व्यक्त केला जात होता.
काबुली हरभरा पिकासाठी यंदा मात्र हवामान तेवढे पोषक राहीले नाही. डिसेंबर महिन्यात पाऊस झाला नाही. याचा परिणाम पिकावर झाला. तर त्यानंतर बदलते वातावरण आणि वादळी पावसामुळे पिकाला फटका बसला. त्यामुळे यंदा बंपर उत्पादनाच्या आशेवर पाणी फेरले.
भारतातील काबुली हरभरा उत्पादन घटल्यामुळे जागतिक पुरवठा जवळपास एक लाख टनाने कमी राहील. भारतामुळे पुरठ्यावर आणखी ताण वाढून दरात सुधारणा होईल, अशा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत.
काबुली हरभरा भाव सध्या सरासरीपेक्षा जास्त आहेत. जागतिक बाजारात काबुली हरभऱ्याची मगील सात महिन्यांपासून टंचाई भासत आहे. भारतातही उत्पादन घटल्याने भारताला आयात वाढवावी लागेल.
काबुली हरभऱ्यासाठी भारताचे लक्ष रशिया, कॅनडा, अमेरिका आणि टर्कीवर असेल. पण जागतिक बाजारातच तुटवडा राहण्याचा अंदात असून दरही वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सहा महिने टंचाई राहणार
रशिया, कॅनडा, अमेरिका आणि टर्की या देशांनी काबुली हरभरा लागवड ३० टक्क्यांनी वाढवली तरी पुढील किमान सहा महिने काबुली हरभऱ्याची टंचाई भासणार आहे.
त्यातही मोठ्या आकाराच्या काबुली हरभऱ्याचा तुटवडा अधिक आहे. रशिया आणि युक्रेन युध्दामुळेही काबुली हरभरा पुरवठ्यात अडचणी येत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.