Banana : खानदेशात केळी दर व्यापाऱ्यांनी पाडले

खानदेशात केळी दरात मागील काही दिवसांत घसरण झाली. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून, १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी केली जात आहेत.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात केळी दरात (Banana Rate) मागील काही दिवसांत घसरण झाली. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून, १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी (Banana Procurement) केली जात आहेत. मागणी कमी व इतर फळांची बाजारात आवक वाढल्याचे कारणही खरेदीदार किंवा व्यापारी पुढे करीत आहेत.

Banana
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

केळीचे दर रावेर (जि. जळगाव) बाजार समिती जाहीर करते. सध्या २२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीसाठी बाजार समिती जाहीर करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून खरेदीदार मागील काही दिवसांपासून केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी सांगत होते. तर गेल्या तीन-चार दिवसांपासून १२००, १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी सांगत आहेत. खरेदीपूर्वी व्यापाऱ्यांचे एजंट, कर्मचारी बागेची पाहणी करतात. त्यात दर सांगितला जातो. आपल्याला अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी नकार देतात. यानंतर शेतकरी इतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो. पण इतर व्यापारीदेखील कमीच दर सांगतात. सफरचंद व इतर फळे येत आहेत. केळीची मागणी घटली आहे, अशी बतावणी सर्वच खरेदीदार करीत आहेत.

Banana
Soybean : सोयाबीन, कापूस, हळदीत उतरता कल

लिंबाच्या रंगाच्या दर्जेदार केळीला मागणी आहे. तिची निर्यात होते. मॉलमध्ये तिला उठाव आहे, अशी कारणेदेखील सांगून खरेदीदार कमी दरात सर्रास केळीची खरेदी जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा आदी भागांत करीत आहेत. केळी काढणीवर हवी तेवढी उपलब्ध नाही. सणासुदीचे, उत्सवाचे दिवस आहेत. राज्यासह इतर भागातही केळीला उठाव आहे. परंतु खरेदीदारांनी एकी करून दर पाडल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर प्रशासन, बाजार समितीने कारवाईसत्र उगारायला हवे. कारण रावेर व इतर बाजार समित्या फक्त दर जाहीर करतात, परंतु या दरांत केळीची खरेदी केली जाते की नाही, याबाबत चौकशी करीत नाहीत. यामुळे बाजार समित्यादेखील दोषी आहेत. प्रशासन लेखी तक्रार करा, असे सांगते. पण पुढे काहीएक करीत नाही. यात शेतकऱ्यांची फवसणूक होत आहे, असे सांगितले जात आहे.

केळीचे दर ज्या वेळी २८०० किंवा ३२०० पर्यंत होते, त्या वेळी आमच्या भागात २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीची खरेदी केली जात होती. आता २२०० वर दर आहेत. परंतु खरेदी १२०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. या प्रकाराची तपासणी, चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी.
श्रीकांत पाटील, केळी उत्पादक, कठोरा (ता. जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com