Banana Market
Banana MarketAgrowon

Banana Market Khandesh : खानदेशात केळी दर व्यापाऱ्यांनी पाडले

Banana Rate : खानदेशात केळी दरात मागील काही दिवसांत घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून १३०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल या दरात केळीची खरेदी केली जात आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील काही दिवसांत घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून १३०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल या दरात केळीची खरेदी केली जात आहे. मागणी कमी व इतर फळांची बाजारात आवक वाढल्याचे कारणही खरेदीदार किंवा व्यापारी पुढे करीत आहेत.\

केळीचे दर रावेर (जि. जळगाव) बाजार समिती जाहीर करते. सध्या १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचे दर दर्जेदार केळीसाठी बाजार समिती जाहीर करीत आहे. परंतु याकडे दर्लक्ष करून खरेदीदार मागील काही दिवसांपासून केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर व्यापारी सांगत होते.

Banana Market
Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

तर तीन-चार दिवसांपासून १२००, १४००, १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर व्यापारी सांगत आहेत. खरेदीपूर्वी व्यापाऱ्यांचे एजंट, कर्मचारी बागेची पाहणी करतात. त्यात दर सांगितला जातो. आपल्याला अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी नकार देतात. यानंतर शेतकरी इतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो. पण इतर व्यापारीदेखील कमीच दर सांगतात.

सफरचंद व इतर फळे येत आहेत. केळीची मागणी घटली आहे, अशी बतावणी सर्वच खरेदीदार करीत आहेत.लिंबाच्या रंगाच्या दर्जेदार केळीला मागणी आहे. तिची निर्यात होते. मॉलमध्ये तिला उठाव आहे, पण या केळीचे दरही १६०० रुपयेच आहेत.

Banana Market
Banana Rate: दर पाडून केळी खरेदी 

जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा आदी भागांत केळीचे दर व्यापारी लॉबीने कमी केले आहेत. केळी काढणीवर हवी तेवढी नाही. सणासुदीचे, उत्सवाचे दिवस आहेत.

राज्यासह इतर भागांतही केळीला उठाव आहे. परंतु खरेदीदारांनी एकी करून दर पाडल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर प्रशासन, बाजार समितीने कारवाईसत्र राबवायला हवे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com