Banana Price Drop: खानदेशातील बाजारात व्यापाऱ्यांनी पाडले केळीचे दर

Banana Market Update: खानदेशातील जळगाव आणि इतर भागांमध्ये केळीच्या दरात मोठी घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात केळी खरेदी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
Banana Price
Banana PriceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात केळी दरात मागील काही दिवसात घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून, १००० ते १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी केली जात आहे. मागणी कमी व इतर फळांची बाजारात आवक वाढल्याचे कारणही खरेदीदार किंवा व्यापारी पुढे करीत आहेत.

केळीचे दर रावेर (जि.जळगाव) बाजार समिती जाहीर करते. सध्या १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीसाठी बाजार समिती जाहीर करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून खरेदीदार मागील काही दिवसांपासून केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी सांगत होते.

Banana Price
Banana Rate: खानदेशात केळी बाजारात स्थिरता; दर १८०० ते २१०० रु. प्रतिक्विंटल

तर गेल्या तीन-चार दिवसांपासून १२००, १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी सांगत आहेत. खरेदीपूर्वी व्यापाऱ्यांचे एजंट, कर्मचारी बागेची पाहणी करतात. त्यात दर सांगितला जातो. आपल्याला अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी नकार देतात.

यानंतर शेतकरी इतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो. पण इतर व्यापारीदेखील कमीच दर सांगतात. सफरचंद व इतर फळे येत आहेत. केळीची मागणी घटली आहे, अशी बतावणी सर्वच खरेदीदार करीत आहेत.लिंबाच्या रंगाच्या दर्जेदार केळीला मागणी आहे. तिची निर्यात होते.

Banana Price
Banana Plantation : मृग बहर केळीचे क्षेत्र पोहोचणार ७५ हजार हेक्टरवर

मॉलमध्ये तिला उठाव आहे, अशी कारणेदेखील खरेदीदार सांगून कमी दरात सर्रास केळीची खरेदी जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा आदी भागांत केली जात आहे. केळी काढणीवर हवी तेवढी उपलब्ध नाही. सणासुदीचे, उत्सवाचे दिवस आहेत. राज्यासह इतर भागातही केळीला उठाव आहे.परंतु खरेदीदारांनी एकी करून दर पाडल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर प्रशासन, बाजार समितीने कारवाईसत्र उगारायला हवे. कारण रावेर व इतर बाजार समित्या फक्त दर जाहीर करतात, परंतु या दरांत केळीची खरेदी केली जाते की नाही, याबाबत चौकशी करीत नाहीत. यामुळे बाजार समित्यादेखील दोषी आहेत. प्रशासन लेखी तक्रार करा, असे सांगते. पण पुढे काहीएक करीत नाही. यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com