Anil Jadhao
राज्यातील केळी उत्पादकांना यंदा सुरुवातीपासून चांगला दर मिळत होता. पण महिनाभरानंतर आवक वाढल्याचे आणि मागणी घटल्याचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी केळीचे दर पाडले.
देशातील बाजारात सध्या केळीची आवक घटलेली आहे. मात्र केळीला मागणी कायम आहे.
देशातील बहुतांशी भागात थंडी वाढल्याने केळीला उठावही जास्त मिळतोय. मात्र दर दबावातच आहेत.
सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे केळी खूपच कमी उपलब्ध आहे.
सध्या व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांनी साठवून ठेवलेली केळी जास्त प्रमाणात बाजारात येत असल्याचं केळी व्यापाऱ्यांनी सांगितलं.