
Akola News : मक्यासाठी विदर्भातील प्रसिद्ध मलकापूर (जि. बुलडाणा) बाजार समितीत सध्या सरासरी २ हजार १३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. बाजारात सध्या आवक कमी आहे.
मलकापूर बाजार समितीतून दरवर्षी हजारो टन मक्याची खरेदी करून विविध भागात माल पाठविला जातो. शिवाय निर्यात देखील होते.
या बाजारात शुक्रवारी (ता. ४) मक्याला किमान दर १ हजार ९७५ व कमाल २१३५ रुपये दर मिळाला. २१५ क्विंटल मक्याची आवक झाली. सध्या खरीप मक्याची लागवड झालेली आहे. हा नवीन माल यायला अजून बराच कालावधी लागेल.
मक्याचे पीक आता कुठे महिना तर कुठे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे झाले आहे. येत्या हंगामातही मक्याला चांगला दर मिळेल, अशी शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तुरीला सरासरी ९ हजार ९०० रुपये दर
या बाजार समितीत तुरीला सरासरी ९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला. आवक २३२ क्विंटल झाली. ४६ शेतकऱ्यांनी हा माल विक्रीस आणला. तुरीचा किमान दर ८ हजार ८०० तर कमाल १० हजार ७०० रुपयांचा मिळाला.
तुरीचा हंगाम आटोपत आला आहे. त्यामुळे कमी आवक होत आहे. ज्वारीला सरासरी २९०० रुपयांचा दर मिळाला. ज्वारीला किमान १ हजार ८९५ रुपये, तर कमाल ३ हजार ८० रुपये दर मिळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.