Team Agrowon
अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो.
अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. मक्याच्या शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.
बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो.
सूप, लोणचे, भजी बनविण्यासाठी या मक्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये मागणी असते.
लाह्या बनविण्यासाठी बेबीकॉर्नचा उपयोग होतो.
कणसे उकडून भाजून खाण्यासाठी मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्नला जास्त मागणी असते.
ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च, साखर,तेल, पेंड यांचा वापर कापड, कागद, औषधे, बेकरी या व्यवसायात केला जातो.