Green Hydrogen : ग्रीन हायड्रोजनसाठी ऑस्ट्रेलियाची मदत

इथेनॉल क्षेत्रात दमदार पदार्पण केल्यानंतर राज्याचा साखर उद्योग आता ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणीची स्वप्ने पाहू लागला आहे.
Green Hydrogen
Green HydrogenAgrowon
Published on
Updated on

पुणे ः इथेनॉल क्षेत्रात (Ethanol Production) दमदार पदार्पण केल्यानंतर राज्याचा साखर उद्योग (Maharashtra Sugar Industry) आता ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणीची (Green Hydrogen Project Establishment) स्वप्ने पाहू लागला आहे. त्यासाठी साखर उद्योगाचे एक शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेले आहे.

शिष्टमंडळात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच साखर उद्योगातील इतर प्रतिनिधींचा समावेश आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषदेने (टीपीसीआय) या दौऱ्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास तसेच मेलबर्न येथील वकिलातीमधील उच्च अधिकारी या उपक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. राज्यातील साखर कारखाने सध्या बगॅस जाळून वाफेवर आधारित सहवीजनिर्मिती करतात. याच कारखान्यांमध्ये शाश्‍वत हवाई इंधन (एसएएफ) तयार होऊ शकते. तसेच ग्रीन हायड्रोजनदेखील तयार करणे शक्य आहे.

Green Hydrogen
Sugar Mills: बहुतांश कारखान्यांकडून साखर उतारा प्रमाणपत्रे सादर

माजी केंद्रीय कृषिमंत्री व ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या दौऱ्यात सामील होणार होते. तथापि, राजकीय बैठका व राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

“ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात साखर उद्योगाचे शिष्टमंडळ पर्थ येथील अॅटको ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाला भेट देत आहे. ग्रीन हायड्रोजन निर्मितीबाबत भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियातील उद्योगपती डॉ. दिलावर सिंग यांच्याकडून भारतीय साखर उद्योगाला मोलाचे सहकार्य मिळते आहे. तसेच ऑस्ट्रेलियामधील कॉन्सूल जनरल नरेश शर्मा यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळते आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Green Hydrogen
Sugar Export Restriction पुढील हंगामात नको; साखर उद्योग|Sugar Bajarbhav|Agrowon

भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचा होणार फायदा?

भारत व ऑस्ट्रेलिया सरकारच्या अधिकाधिक मैत्रीचा लाभ साखर उद्योगाला करून घेण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. ग्रीन हायड्रोजन निर्मिती उभारणीसाठी ऑस्ट्रेलियातील कोणते तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, या विषयी बारकाईने अभ्यास करणे, असा मुख्य हेतू हा दौऱ्याचा आहे.

‘सिंनगॅस’निर्मिती अधिक सोपी

हरित हायड्रोजन धोरण भारताने जाहीर केल्यानंतर वायू आधारित पर्यावरणपूरक इंधननिर्मितीला चालना मिळणार आहे. मात्र त्याचे लाभ देशातील साखर कारखान्यांनाही होतील, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. अर्थात, साखर कारखान्यांमध्ये थेट हरित हायड्रोजन निर्माण करणे थोडे कठीण आहे. त्याऐवजी कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन असलेला ‘सिंनगॅस’ तयार करणे मात्र सोपे ठरणार आहे. सध्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून ‘सिंनगॅस’ तयार करून त्याचा ‘हवाई इंधन’ म्हणून पुरवठा करता येईल, असाही विश्‍वास साखर कारखान्यांना वाटतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com