International Millets Year : भरडधान्यांसाठी आसियान देशांनी पुढाकार घ्यावा- तोमर

भरड धान्याचे उत्पादन आणि वापर वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आसियान (Association of Southeast Asian Nations) देशांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलंय.
Millet Crop
Millet CropAgrowon

भरड धान्याचे उत्पादन (Millet Production) आणि वापर वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आसियान (Association of Southeast Asian Nations) देशांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केलंय. २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (International Millet Year) म्हणून घोषित करण्यात आलंय. कृषी आणि वनीकरणावरील सातवी आसियान-भारत मंत्रीस्तरीय बैठक (AIMMAF) नुकतीच पार पडली. त्यावेळी तोमर बोलत होते.

Millet Crop
Proso Millet : आरोग्यदायी भगर

केंद्रीय मंत्री तोमर या बैठकीचे सहअध्यक्ष होते. ब्रुनेई दारुसलाम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलीपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामचे कृषिमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.

Millet Crop
Millet's : भरडधान्य पिकांना हवे दीर्घकालीन धोरण

यावेळी कृषिमंत्री तोमर म्हणाले की, भारत लोकांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी पौष्टिक-धान्य उत्पादनांना प्रोत्साहन देईल. भरड धान्यांच्या उत्पादनासाठी कमी संसाधनांची गरज असते. पण यातून अधिक कार्यक्षम कृषी-अन्न प्रणाली तयार करण्यात मदत होते.

तोमर यांनी अन्न सुरक्षा, पोषण, हवामान बदल अनुकूलन, डिजिटल फार्मिंग, निसर्ग-अनुकूल शेती, अन्न प्रक्रिया, मूल्य साखळी, कृषी विपणन आणि क्षमता बांधणीमध्ये आसियान सोबत भारताचे सहकार्य वाढविण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली.

या बैठकीत आसियान - भारत सहकार्य (वर्ष २०२१-२५) च्या मध्यम-मुदतीच्या कृती आराखड्याअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

कृषी आणि वनीकरणातील आसियान-भारत सहकार्याच्या वचनबद्धतेला या बैठकीत दुजोरा देण्यात आला. COVID-19 साथीच्या रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुधारात्मक उपायांच्या अंमलबजावणीला आसियान-भारत सहकार्याने पाठिंबा दिल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com