Raisin Production : वीस टक्के तयार बेदाणा शेडवरच

राज्यातील बेदाणा हंगाम आटोपला आहे. यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. राज्यातील शीतगृह फुल्ल झाली आहेत.
Raisin Season
Raisin SeasonAgrowon

Raisin Season : राज्यातील बेदाणा हंगाम आटोपला आहे. यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन (Raisin Production) झाले आहे. राज्यातील शीतगृह फुल्ल झाली आहेत. अद्यापही तयार झालेला २० टक्के बेदाणा शेडवरच आहे. त्यामुळे तयार झालेला बेदाणा कुठे ठेवायचा, असा प्रश्‍न बेदाणा उत्पादकांना पडला आहे.

दरम्यान, दरवर्षीपेक्षा यंदाचा बेदाणा हंगाम तब्बल एक महिना उशिरा संपत आहे. सुमारे अडीच लाख टन बेदाणा उत्पादन होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Raisin Season
Raisin Market : कवठेमहांकाळमध्ये एक हजार टन बेदाणा मातीमोल

गेल्या दोन वर्षांत द्राक्षाला चांगले दर मिळाल्याने बेदाणा निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होता. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन सुमारे १ लाख ८० टनांपर्यंत झाले. यंदा मात्र द्राक्षदरात घसरण झाली. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर संकट ओढावले.

त्यातच द्राक्ष हंगामाच्या शेवटी निघून गेलेले व्यापारी परतले. परिणामी, देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी पुढे आले. त्यामुळे बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी गर्दी झाली. बेदाणा तयार करण्यासाठी नंबर लागले होते.

Raisin Season
Raisin Market : सौदे होऊनही ऐनवेळी बेदाणा खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ‘ना’

द्राक्षाच्या सरासरी वाढलेल्या उताऱ्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. सोलापूर, विजापूर भागांत द्राक्ष पीक सांगली जिल्ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.

वास्तविक, यंदाचा बेदाणा हंगाम तब्बल एक महिना उशिरापर्यंत सुरू राहिला. सध्या हंगाम संपला असला, तरी अद्यापही तयार २० टक्के बेदाणा शेडवर शिल्लक आहे. तो शीतगृहात ठेवण्यासाठी जागा नसल्याने उत्पादक हतबल झाले आहेत.

राज्यात १२९ शीतगृहे

राज्यात बेदाणा साठवणुकीसाठी सुमारे १२९ शीतगृहे आहेत. त्याची साठवण क्षमता २ लाख २९ हजार ८०० टन इतकी आहे. सर्वाधिक शीतगृहे सांगली आणि तासगाव भागांत आहेत. सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील बेदाणा शीतगृहे आत्ताच भरली आहेत. मात्र अजूनही बेदाण्याची शीतगृहात आवक सुरूच आहे. मेच्या शेवटपर्यंत ही आवक सुरू राहील.

डॉकवर ठेवण्याशिवाय पर्याय नाही

शीतगृहाच्या बाहेर मोकळी जागा असते, त्याला डॉक असे म्हणतात. त्या जागेत बेदाण्याचे बॉक्स उतरतात. त्यानंतर शीतगृहात ठेवले जातात. परंतु सध्या राज्यातील शीतगृहे फुल्ल असल्याने जागा उपलब्ध नाही. त्यामुळे बेदाणा

डॉक ठेवला जात आहे. मात्र व्यापारी त्याची काळजी घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. डॉकवरील बेदाणा पुन्हा शीतगृहात ठेवला जात असल्याने त्याचे नुकसान होत नाही.

यंदा हंगाम एक महिना उशिरा संपत आहे. बेदाणा उत्पादन यंदाच्या हंगामात वाढले आहे. त्यामुळे शीतगृहातही जागा शिल्लक नाही. तयार झालेला बेदाणा डॉकवर ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
- सुनील माळी, बेदाणा शेडमालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com