Team Agrowon
देशातील गहू उत्पादन यंदा वाढेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण यंदा गहू पिकाला वाढलेली उष्णता आणि वादळी पावसाचा फटका बसत असल्याने उत्पादन यंदा कमीच राहील.
सरकारने खुल्या बाजारात गहू विक्री केल्यानंतर दर नरमले. पण अद्यापही हमीभावापेक्षा जास्तच आहेत. पण सरकारने खुल्या बाजारात गहू विकल्याने सरकारकडील साठा घटला.
सध्या सरकारकडे गव्हाचा साठा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास निम्मा आहे. साठा कमी असल्याने यंदा सरकारने ३४३ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे.
पण सरकारला यंदाही उद्दीष्ट साध्य करता येणार नाही, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
चालू हंगामात देशात १ हजार १२० लाख टन गहू उत्पादन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उष्णतेचा फटका पिकाला बसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पुढील काही दिवसांमध्ये देशातील बाजारात गव्हाची आवक वाढेल. पण सध्या बहुतेक बाजारांमध्ये गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.