Papaya Market : खानदेशात पपईची आवक निम्म्यावर

Papaya market Update उष्णतेची लाट जशी वाढत आहे, तशी खानदेशातील पपईची आवकही घटत आहे. सध्या मार्चच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे.
Papaya Market
Papaya MarketAgrowon

Jalgaon News : ः उष्णतेची लाट जशी वाढत आहे, तशी खानदेशातील पपईची आवकही घटत आहे. सध्या मार्चच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. कमी दरामुळे मोठे क्षेत्र रिकामे झाल्याने आवकेत घट झाली आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत पाच ते सहा रुपये प्रतिकिलो, असे मिळत आहेत.

पपई उष्णतेत सेवन करणे ग्राहक टाळतात. थंड प्रदेशात याची मागणी असते. अर्थात, खानदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईची आवक जोमात असते. यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरीस प्रतिदिन सरासरी ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी पपईची आवक होती.

या काळात प्रतिकिलो सरासरी ११ रुपये प्रतिकिलोचा दर थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरीस प्रतिदिन सरासरी १२० ट्रक पपईची आवक झाली. या काळात दर कमी-अधिक झाले.

Papaya Market
Papaya Season : खानदेशात पपई हंगाम अंतिम टप्प्यात

डिसेंबरमध्ये दर दबावात होते. कारण या काळात आवक अधिक होती. परंतु जानेवारीच्या मध्यानंतर आवक कमी झाली ती फेब्रुवारीतही कमीच होती. यामुळे या दरम्यान दर स्थिर होते. यंदा मार्चमध्येही फारशी उष्णता नव्हती.

यामुळे पपईला मार्चमध्येही उठाव होता. परंतु मार्चमध्ये पपईचे पीक उत्पादनक्षम राहिले नाही. फक्त काही वाणांचे पीक उत्पादनक्षम होते. या क्षेत्रातून आवक सुरू होती. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ४० ट्रक पपईची आवक खानदेशात झाली.

पण एप्रिलमध्ये आवक आणखी घटली आणि या महिन्यातील आवक सरासरी १३ ट्रक एवढीच राहिली. पपईचे दर मार्चमध्ये १० रुपये प्रतिकिलो होते. एप्रिलमध्ये दर कमी झाले. त्यानंतर सुधारणाच झालेली नाही.

Papaya Market
Papaya Update : नाशिकमध्ये पपईंची २०० झाडे अज्ञाताने तोडली

सहा हजार हेक्टर पपई काढली

खानदेशात सुमारे साडेसात हजार हेक्टरवर पपईची लागवड होती. सर्वाधिक पाच हजार हेक्टर लागवड नंदुरबारमध्ये होती. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात साडेचार हजार हेक्टरवर पपई पीक होते.

ही लागवड फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान झाली. धुळ्यातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर या भागात लागवड बऱ्यापैकी राहिली.

या भागातील दर्जा घसरलेल्या पपई पिकाखालील क्षेत्र रिकामे झाले आहे. खानदेशात तब्बल सहा हजार हेक्टरवरील पपई पीक २५ मार्च ते एप्रिलअखेरीस काढण्यात आले आहे.

उत्तरेकडूनही मागणी कमी

उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली, काश्मीर आदी भागांत खानदेशातून पपईची पाठवणूक केली जाते. उष्णतेमुळे एप्रिलमध्येच या भागातून मागणी कमी झाली आहे.

सध्या फक्त काश्मीर, दिल्ली येथील काही मॉल्स आदी भागात पपईची पाठवणूक सुरू आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर येथेही काही प्रमाणात पपईची पाठवणूक केली जाते, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com