Team Agrowon
मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली.
देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते.
सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.
सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे.
त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला.
त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.