Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात गेल्या आठवडाभरात रेशीम कोषांची दररोज ५३ ते १२७ क्विंटल दरम्यान आवक झाली. या रेशीम कोषांना ४६३ ते ५१९ रुपये प्रतिकिलो दरम्यान सरासरी दर मिळाला. गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी (ता. ११) मिळालेला सरासरी ५१९ रुपयांचा दर हा उच्चांकी राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची खरेदी सुरू झाल्यापासून या बाजार समितीत रेशीम कोष विक्रीसाठी आणण्याला शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २ नोव्हेंबरला १२७ क्विंटल ६६ किलो आवक झालेल्या रेशीम कोषांना २७५ ते ५८० रुपये प्रति किलो दरम्यान, तर सरासरी ४८१ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
४ नोव्हेंबरला ११६ क्विंटल ९७ किलो आवक झालेल्या रेशीम कोषाचे दर १०० ते ५६० रुपये प्रति किलो दरम्यान, तर सरासरी ४६३ रुपये प्रति किलो राहिले. ५ नोव्हेंबरला १०३ क्विंटल ७ किलो आवक झालेल्या रेशीम कोषाला १५५ ते ५८० रुपये प्रतिकिलो दरम्यान, तर सरासरी ४७२ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
६ नोव्हेंबरला ३५ क्विंटल ५६ किलो आवक झालेल्या रेशीम कोषाचे दर १५० ते ५८५ रुपये प्रति किलो दरम्यान, तर सरासरी ४९३ रुपये प्रति किलो राहिले. ७ नोव्हेंबरला रेशीम कोषाची आवक ५३ क्विंटल ६६ किलो झाली. या रेशीम कोषांना ३५० ते ५८० रुपये प्रति किलो दरम्यान, तर सरासरी ५०९ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
८ नोव्हेंबरला रेशीम कोषाची आवक ५३ क्विंटल ५३ किलो झाली. या रेशीम कोषांना ३५० ते ५८० रुपये प्रति किलो दरम्यान, तर सरासरी ५०२ रुपये प्रति किलोचा दर मिळाला. ९ नोव्हेंबरला आवक वाढून ८२ क्विंटल ७९ किलो झाली. या आवक झालेल्या रेशीम कोषाचे दर २०० ते ५६५ रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ४९५ रुपये प्रति किलो राहिले.
११ नोव्हेंबरला रेशीम कोषाची आवक पुन्हा वाढवून १२६ क्विंटल ९८ किलो ५० ग्रॅम वर पोहोचली या रेशीम कोषांना २२० ते ६१० रुपये प्रति किलो, तर सरासरी ५१९ रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.