Future Market : हळदीची तेजी कमी; हरभऱ्याचीही काहीशी घसरण

Turmeric Market : हळदीच्या किमतीतील तेजी आता कमी होऊन किमती घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात टोमॅटोची व कांद्याची आवक वाढली.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमतीः सप्ताह १६ ते २२ सप्टेंबर २०२३
हळदीच्या किमतीतील तेजी आता कमी होऊन किमती घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात टोमॅटोची व कांद्याची आवक वाढली. कांद्याची किंमत घसरून रु. १,८०० वर आली आहे, तर टोमॅटो रु. ४३६ वर आहे. २२ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.  

कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ६१,५६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्याने घसरून रु. ६०,९८० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.२ टक्क्याने घसरून रु. ६०,७०० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ६१,०८० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.२ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५५३ वर आले होते. या सप्ताहात ते १.९  टक्क्याने घसरून रु. १,५५३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५२ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.८ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

Turmeric Market
Turmeric Futures Rate : हळदीच्या वायद्यांमध्ये १५ दिवसांत मोठी तेजी

मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,०८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०८५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती रु. २,०९७  वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,११२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.४ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,६२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १३,६९१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती ७.८ टक्क्यांनी घसरून रु. १४,३७८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १५,०९४ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १०.२ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीमधील तेजी कमी झाली आहे. किमती कमी होत आहेत.

Turmeric Market
नगरला चिंचेच्या दरात काहीशी घसरण

हरभरा
हरभऱ्याच्या  स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. ६,०२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ६,२२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव सातत्याने वाढत होते; मात्र १ सप्टेंबरपासून ते घसरत आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ८.४ टक्क्यांनी घसरून रु. ८,६७५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,००० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,०७५ वर आली होती. या सप्ताहात ती ३ टक्क्यांनी घसरून रु. ५,००० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.९ टक्क्यांनी वाढून रु. १०,७२५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ३ टक्क्यांनी घसरून रु. १०,४०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. यंदा तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,१३० होती; या सप्ताहात ती घसरून रु. १,८०० वर आली आहे.  
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ३६० वर आली होती. या सप्ताहात त्या रु. ४३६ वर आल्या आहेत.  

 : arun.cqr@gmail.com
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com