नगरला चिंचेच्या दरात काहीशी घसरण

गेल्या आठ दिवसांपासून आवकही कमी झाली आहे. सध्या ७०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दरही आठ हजारांच्या आत आला आहे.
Tamarind
TamarindAgrowon
Published on
Updated on

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेच्या दरात घसरण झाली आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या चिंचेला पाच हजार ते ८ हजार पाचशे रुपयांपर्यंत व सरासरी ६७५० रुपये दर मिळत आहे. हा दर एक महिन्यापूर्वी पंधरा हजारांपर्यंत गेला होता. दर तर कमी झालाच, पण आवकही कमी झाली आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत नगर जिल्ह्यासह सोलापूर, औरंगाबाद, बीडसह राज्यांतील विविध भागांतून चिंच विक्रीला येते. येथून देशभरातील विविध राज्यांत, तसेच परदेशातही चिंचेची निर्यात होत आहे. चिंचेसोबत बोटूक चिंच, चिंचोकाही बऱ्यापैकी विक्रीला येतो. नगरचा बाजार चिंचेसाठी सतत चर्चेत असतो.

या वर्षी दोन महिन्यांपासून चिंच बाजारात येत आहे. साधारण महिनाभरापूर्वी फोडलेल्या एक नंबरच्या चिंचेची दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होऊन ५ हजार ते पंधरा हजार व सरासरी १० हजार रुपये क्विंटलच्या जवळपास दर मिळत होता. गेल्या आठ दिवसांपासून आवकही कमी झाली आहे. सध्या ७०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दरही आठ हजारांच्या आत आला आहे. फोडलेल्या चिंचेसह अखंड चिंचेचीही दर दिवसाला ३० ते ५० क्विंटलची आवक होत असून, एक नंबरच्या चिंचेसोबत ५० ते ६० क्विंटलची आवक होत असून, ३०० ते १८०० रुपये तर चिंच बोटुकाची २०० ते २५० क्विंटलची आवक होत असून, २७०० ते २९०० रुपये दर मिळत आहे. चिंचोक्याची आवक होत असून १५०० ते १५७५ रुपये दर मिळतोय. गेल्या महिनाभराच्या तुलनेत नगरला चिंचेचे बऱ्यापैकी दर कमी झाले आहेत.

फळांची आवक टिकून

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून फळांची आवक टिकून आहे. कलिंगडाची साडेतीनशे क्विंटलच्या जवळपास, तर खरबुजाची ७० ते १०० क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे. आंब्यांची आवकही वाढत आहे. हापूस, लालबाग, बदाम, केशर, पावरी आंब्याची मिळून दररोज शंभर क्विंटलच्या वर आवक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com