Tur Market: तुरीचे भाव तेजीतच; स्टाॅक लिमिटचा परिणाम नाही

Tur Rate : देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

Tur Bajarbhav : देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावले तरी भावात नरमाई दिसून आली नाही. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील काही बाजारांमध्ये तुरीने ११ हजारांचा टप्पा गाठल्यानंतर सरकारने तातडीने स्टाॅक लिमिट लावले. घाऊक बाजारात तूर सध्या प्रतिकिलो १०० रुपयांवर पोचली.

तर खुल्या बाजारात तूर डाळीने १५० रुपयांचा टप्पा गाठला. निवडणुकीच्या तंद्रीत असलेल्या सरकारसाठी ही चिंतेची बाब होती. त्यामुळे सरकारने तुरीवर स्टाॅक लावले, असे व्यापारी सांगत आहेत.

देशातील तुरीचे उत्पादन घटल्याचे स्पष्ट झाल्यापासूनच सरकार दरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तूर ८ हजारांवर पोचल्यानंतर सरकारने व्यापारी, मिलर्स आणि आयातदारांना स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले. मुक्त तूर आयात धोरण एक वर्षासाठी वाढवले.

Tur Market
Tur Import : सरकारच्या धोरणामुळेच तूर आयातीची वेळ?

यामुळे तुरीची आयात वाढीसाठी मदत होईल, अशी आशा सरकारला होती. पण विदेशात तुरीचे उत्पादन मर्यादीत होते. भारत हाच महत्वाचा ग्राहक असल्याने विदेशात जास्त तुरीचे उत्पादन होत नाही. आफ्रिकेतील काही देश आणि म्यानमारमध्ये तूर उत्पादन होते.

सरकारने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर तूर डाळीच्या भावात २०० रुपयांपर्यंत नरमाई आली होती. पण तुरीचे भाव कायम राहीले. तुरीचा सरासरी कमाल भाव १० हजार ५०० रुपयांवर आहे. तर किमान भाव आता ९ हजारांच्या पुढे गेले.

देशातील महत्वाच्या लातूर, गुलबर्गा, अकोला, अमरावती या बाजारांमध्येच तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशात तुरीचा पुरवठाच कमी असल्याने दरात पुढील काळातही तेजी राहू शकते, असा अंदाज आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये सप्टेंबरपासून तुरीची आवक सुरु होईल. तोपर्यंत आवकेची गती कमी राहील. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com