Chana Market Rate : हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच

Chana MSP Price : जून महिन्यात सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही वर्षांत पाऊसच नव्हे तर एकूण हवामानच अधिकाधिक अनिश्चित होत आहे.
Chana Rate
Chana Rate Agrowon

फ्युचर्स किमती : सप्ताह - २७ मे ते २ जून २०२३

Rain Update : जून महिन्यात सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही वर्षांत पाऊसच नव्हे तर एकूण हवामानच अधिकाधिक अनिश्चित होत आहे.

बाजारातील साठा, आयात व निर्यात आणि सतत बदलणारी आंतरराष्ट्रीय परिस्थिती यामुळे ऑक्टोबर नंतरचे उत्पादनाचे व किमतीचे अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्पॉट व फ्युचर्स किमतींच्या चढ-उताराकडे लक्ष द्यावे.

१ जून पासून NCDEX मध्ये ऑक्टोबर डिलिवरीसाठी मका व डिसेंबर डिलिवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरु झाले. सध्या NCDEX मध्ये मक्यासाठी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिवरीसाठी तर हळदीसाठी जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर डिलिवरीसाठी व्यवहार करता येतील.

MCX मध्ये कापसासाठी जून, ऑगस्ट, नोव्हेंबर व जानेवारी (२०२४) डिलिवरीसाठी तर कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी (२०२४) व एप्रिल (२०२४) साठी व्यवहार करता येतात.

Chana Rate
Chana Procurement : अमरावतीत हरभरा खरेदीत पुन्हा दीड लाखाने उद्दिष्ट वाढ

गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात मका, हळद व मूग यांचे भाव घसरले. कापसाचे भाव ३.७ टक्क्यांनी तर हरभऱ्याचे ३.१ टक्क्यांनी वाढले. तुरीच्या वाढीचा कल याही सप्ताहात टिकून राहिला. मे महिन्यात कापूस, मका व सोयाबीन यांच्या किमती घसरल्या.

खरीप हंगामातील पाउस व लागवडीखालील क्षेत्र यांचा परिणाम पुढील किमतींवर होईल. स्पॉट व फ्युचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्युचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर ठरेल.

२ मे रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ५.७ टक्क्यांनी घसरून रु. ५६,२०० वर आले. या सप्ताहात ते ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ५८,३४० वर आले आहेत. ऑगस्ट फ्युचर्स भाव रु. ६०,२२० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.३ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,३९० वर आले होते. या सप्ताहात ते ४.९ टक्क्यांनी वाढून रु. १,४५८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५२० वर आहेत. ते जवळ जवळ स्पॉट भावाइतकेच आहेत.

मका

NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. १,७९५ वर आल्या आहेत. फ्युचर्स (जुलै डिलिवरी) किमतीसुद्धा १.५ टक्क्यांनी घसरून रु. १,८१२ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्युचर्स किमती रु. १,८३४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.२ टक्क्यांनी अधिक आहेत.

Chana Rate
Chana Market : हरभरा भाव दबावात; नाफेडची खेरदी जोमात

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ७,४८५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,३७० वर आल्या आहेत.

ऑगस्ट फ्युचर्स किमती ५.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,८८० वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. ८,२२२ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ११.६ टक्क्यांनी अधिक आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. ८,५६४) चांगला आहे. फ्युचर्स विक्रीला अजून अनुकूल संधी आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ४,८५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,००० वर आल्या आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ४ टक्क्यांनी वाढून रु. ९,१५० वर आली.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

लेखक ई-मेल : arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com