Chana Market : हरभरा भाव दबावात; नाफेडची खेरदी जोमात

Chana Rate : देशातील बाजारात आजही हरभरा भाव दबावात होते. हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
Chana Market
Chana Market Agrowon

Chana Procurement : देशातील बाजारात आजही हरभरा भाव दबावात होते. हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. नाफेडची खरेदी २१ लाख ६४ हजार टनांवर होऊनही खुल्या बाजारात भाव दबावात आहेत. सरकारला हरभरा भावाच्या आडून तूर आणि उडदाचे भाव कमी करायचे आहेत, असे जाणकारांनी सांगितले.

सरकारने यंदा देशात १३५ लाख ४३ हजार टन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन केवळ १ हजार टनाने कमी राहील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.

पण यंदा हरभरा पिकाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे उत्पादकता २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे शेतकरी सांगत होते. मात्र सरकारने यंदाही गेल्यावर्षीऐवढे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला.

चालू हंगामात सुरुवातीपासून हरभरा भाव दबावात आहेत. त्यामुळे सरकारच्या खरेदीवर हरभरा बाजाराची भीस्त होती. सरकारने आतापर्यंत २१ लाख ६५ हजार टनांची हमीभावाने खरेदी केली. यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे.

पण असं अतानाही खुल्या बाजारात हरभरा दबावातच आहे. वास्तविक पाहता सरकारची खरेदी वाढत असल्याने खुल्या बाजारात हरभरा भाव वाढणे अपेक्षित होते. पण झालं उलटं. खरेदी वाढत असूनही भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

Chana Market
Chana Procurement : परभणीत हमीभावाने २ लाख ५९ हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. सरकार हरभऱ्याची खरेदी इतर डाळींचे भाव कमी करण्यासाठी वाढवत असल्याचे व्यापारी आणि जाणकार सांगत आहेत. यंदा तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत.

मुगही हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकार हरभरा स्वस्तात बाजारात आणेल. मागील हंगामात सरकारने हेच केले होते. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.

गेल्या हंगामात देशात तूर, मूग, उडीद आणि मसूरचे उत्पादन चांगले होते. पण यंदा तूर आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली. तर हरभरा उत्पादनही सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत.

त्यामुळे सरकारने पुढील काळात हरभरा कमी भावात बाजारात आणला तरी इतर डाळींचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com