
रब्बी अन खरिपादरम्यानच्या काळात घेतल्या जाणाऱ्या उन्हाळ पिकांच्या (Summer Crops) लागवड क्षेत्रात यंदा ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. १८ एप्रिलपर्यंत देशभरात ६०.१२ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५८.३२ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिके घेण्यात आली होती.
यंदा उन्हाळ पिकांमध्ये कडधान्य (Pulses) लागवडीत ३७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर तृणधान्य (Cereals) आणि तेलबिया (Oil seeds)लागवड क्षेत्रातही गेल्यावर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची नोंद आहे. उन्हाळ पिकांमध्ये यंदा भातपिकाच्या लागवडीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे.
उन्हाळ पिकांत कडधान्य (Pulses) लागवडीचे क्षेत्र १२.२१ लाख हेक्टरवर गेले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ८.९ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची (Pulses) लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामाला पूरक म्हणून सरकार या काळातील कडधान्य लागवडीकडे पहात आहे.
यंदा ८.६२ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ मुगाची (Moong) लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६.७३ लाख हेक्टर क्षेत्रात मूग घेण्यात आले होते. उडदाचे क्षेत्र यंदा ३.२२ लाख हेक्टरवर गेले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ १.८६ लाख हेक्टर क्षेत्रात उडीद घेण्यात आला होता.
कडधान्य लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी उन्हाळ भातपीक (Paddy) लागवडीत घट झाली आहे. यंदा २८. ५१ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ३०.२८ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची (Paddy) लागवड करण्यात आली होती.
पश्चिम बंगालमधील भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र ९. २७ लाख हेक्टर आहे. तेलंगणात ६.७४ लाख हेक्टर क्षेत्रात, कर्नाटकात २.९६ लाख हेक्टर क्षेत्रात, ओडिशात २. ०३ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आली आहे.
यंदा उन्हाळ्यातील प्रमुख तृणधान्यांच्या (Cereals) लागवडीतही किंचित वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ९.१९ लाख हेक्टर क्षेत्रात तृणधान्य लागवड करण्यात आली होती.त्यातुलनेत यंदा ९.२२ लाख हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड (Cereals)करण्यात आली आहे.
उन्हाळ तेलबिया (Oil seeds) लागवडीचे क्षेत्रही काहीसे वाढले आहे. १०.१८ लाख हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड केली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ९. ८५ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया लागवड करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये २.८७ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १.३७ लाख हेक्टर क्षेत्रात, गुजरातमध्ये १.६४ लाख हेक्टर क्षेत्रात, उत्तर प्रदेशात १.०४ लाख हेक्टर क्षेत्रात, कर्नाटकात १.०१ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.