Tur Import : तूर आयातशल्क काढले; दर कमी होतील का?

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका तूर पिकाला बसला.
Tur Import
Tur ImportAgrowon

Tur Market Update : देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. शेतकरी तुरीची विक्री मर्यादीत करत आहेत. पण तुरीला चांगला उठाव असल्यानं ऐन हंगामात दर कमी होताना दिसत नाही. त्यामुळं सरकारनं तूर (Tur Import Duty) आयातीवरील १० टक्के आयातशुल्क काढण्याचा निर्णय घेतला.

पण सरकारने आधीच मुक्त आयात धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे आयातशुल्क काढल्याचा तुरीच्या दरावर परिणाम होणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका तूर पिकाला बसला. त्यामुळं तूर उत्पादन घटणार हे स्पष्ट झाले होते. उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आल्यानं स्टाॅकिस्टनी तुरीची मर्यादीत विक्री सुरु ठेवली.

परिणामी बाजारात तुरीचे दर तेजीत आले. दुसरीकडे सरकारनेही तुरीचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबवले. या धोरणाला एक वर्षाची मुदतवाढही दिली. तसचं आयात तूर खेरदीही केली.

Tur Import
Tur Market : तूर यंदा ९ हजारांचा टप्पा गाठेल का?

शेतकऱ्यांची तूर हाती आल्यानंतर भाव नरमतील, अशी आशा सरकारला होती. पण बाजारातील तेजी पाहून शेतकऱ्यांनी तुरीची मर्यादीत विक्री सुरु ठेवली. सध्या देशातील तूर काढणी वेगाने सुरु आहे. काही भागात तूर काढणी पूर्णही झाली.

पण बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. तसचं पुढील काळात तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय आहे निर्णय?

तुरीचे दर कमी होत नाही म्हटल्यावर सरकारनं ३ मार्च रोजी तुरीच्या आयातीवरील शुल्क १० टक्क्यांवरून शुन्य केलं. पण सरकरानं याधीच मुक्त तूर आयात धोरण सुरु ठेवलंय. त्यामुळं या निर्णयाचा बाजारावर परिणाम जाणवणार नाही. कारण आफ्रिकेतील तूर आता संपत आली.

म्यानमारमधून तूर आयात सुरु आहे. पण यंदा आयात वाढली तरी देशातील उत्पादन कमी असल्यानं दरावर दबाव येण्याची शक्यता कमीच आहे.

आयात वाढेल का?

सरकारनं यंदा १० लाख टन तूर आयातीचं उद्दीष्ट ठेवलं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध नसते. भारताला सर्व तूर काही आयात करता येणार नाही.

त्यामुळं यंदा ८ लाख १० हजार टनांपेक्षा जास्त तूर आयात होण्याची शक्यता कमीच आहे. कारण आफ्रिका आणि म्यानमारमध्ये आता जास्त तूर शिल्लक नाही. 

Tur Import
Tur Rate : अकोल्यात तूर दर सरासरी ७७०० रुपये

दरातील तेजी टिकेल

सरकारनं आयातशुल्क काढलं तरी त्याचा परिणाम तुरीच्या दरावर होणार नाही. सध्या तुरीला बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

देशातील तुरीचा तुटवडा बघता तुरीचे दर पुढील काळातही तेजीत राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com