Tur Rate : अकोल्यात तूर दर सरासरी ७७०० रुपये

जवळपास महिनाभरापासून बाजार समितीत तुरीची आवक सतत वाढत आहे. मध्यंतरी लिलाव व मोजमाप होण्यास विलंब झाल्याने बाजार समितीने नवीन आवक थांबवली होती.
Tur Rate
Tur Rate Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीची जोरदार आवक होत असून, दरही समाधानकारक मिळू लागले आहेत.

अकोला बाजार समितीत शुक्रवारी (ता. १७) तुरीला सरासरी ७७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारात सुमारे २४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती.

जवळपास महिनाभरापासून बाजार समितीत तुरीची आवक सतत वाढत आहे. मध्यंतरी लिलाव व मोजमाप होण्यास विलंब झाल्याने बाजार समितीने नवीन आवक थांबवली होती.

आता व्यवहार सुरळीत करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. बाजार समितीत तुरीला किमान ५६०० रुपयांचा दर मिळाला.

तर कमाल दर ८३०० रुपयांपर्यंत होता. मागील काही दिवसांपासून दररोज दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवत तुरीची आधी विक्री चालवली आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वत्र तूर विक्रीकडे कल दिसून येत आहे.

Tur Rate
Tur Rate : हिंगोलीत तुरीचे दर प्रति क्विंटल ७५०० ते ८५५० रुपये

अकोला ही या विभागातील मध्यवर्ती बाजार समिती असून येथील दरांचा प्रभाव इतर ठिकाणी पडत असतो.

त्यामुळे बाजारात अकोल्यातील दरांना महत्त्व दिले जाते.

यंदा तुरीला ६६०० या किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर सर्वत्र मिळत आहे. सध्या तूर काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

त्यामुळे तुरीची आवक आणखी महिनाभर तरी कायम राहील, असा अंदाज सूत्रांकडून वर्तवण्यात आला.

हरभऱ्याचा दर हमीभावाच्या आत
तुरीला बाजारात चांगला दर मिळत असतानाच आता हरभऱ्याचा हंगामही सुरू झाला असून दर मात्र किमान आधारभूत किमतीच्या आत आहे.

बाजारात हरभरा अवघा चार हजारांपासून विक्री होत आहे. सरासरी ४५५० पर्यंत दर येथील बाजारात मिळाला.

या हंगामात शासनाने हरभऱ्याला आधारभूत किंमत ५३३५ रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेली आहे. यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्र कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com