Chana Procurement : तीन जिल्ह्यांत ३७ केंद्रांवरून आधारभूत किमतीने हरभरा खरेदी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व लातूर या तीन जिल्ह्यातील ३७ केंद्रांवरून ५३३५ रुपये प्रतिक्विंटल या दराने आधारभूत किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे.
Chana Procurement
Chana ProcurementAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व लातूर या तीन जिल्ह्यातील ३७ केंद्रांवरून ५३३५ रुपये प्रतिक्विंटल या दराने आधारभूत किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी उद्दिष्ट ठरवून प्रत्येक जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात आली. ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आगाऊ नोंदणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या.

त्यामुळे नोंदणीच्या विहित मुदतीत अनेक शेतकऱ्यांना आपला हरभरा आधारभूत किमतीने खरेदी केला जावा यासाठी नोंदणी करता आली नाही. त्यांना बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केला जात असलेल्या हरभऱ्याच्या खरेदी व्यवस्थेतच आपला हरभरा घालावा लागला.

जालना, लातूर व छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यात खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी अजून निम्मा हरभरा गोडाऊन मध्ये साठविणे बाकी असून पिकलेल्या हरभऱ्याचे पैसेही मोठ्या प्रमाणात मिळणे बाकी आहे.

Chana Procurement
Chana Procurement : हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ९ केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांवरून जवळपास ४६१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्या सर्वांना आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. जिल्ह्यातील गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद व पाचोड या केंद्रांवरून २६९ शेतकऱ्यांकडील ३०४३.५० क्विंटल हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली.

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी २८३१.५० क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला तर २१२ क्विंटल हरभरा अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे. जालना जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १२ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रांवरून १९४६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १७४४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १३२३२ शेतकऱ्यांकडून २ लाख ८ हजार ९७ क्विंटल ५० किलो हरभऱ्याचे आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या हरभऱ्यापैकी ६२,४७५ क्विंटल हरभरा अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे.

लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी १६ केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवरून २४ हजार ५३२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी २३ हजार ४२३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले.त्यापैकी १६४१२ शेतकऱ्यांकडून २ लाख ३७ हजार २०९ क्विंटल ८७ किलो हरभरा हा आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला.

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी १ लाख ७६ हजार ८२१ क्विंटल हरभरा गोडाऊन मध्ये साठविण्यात आला असून ६००३८८.३७ क्विंटल अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com