Chana Procurement : हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण

हिंगोली जिल्ह्याला दिलेले ४ लाख ३१ हजारांवर १९० क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे मंगळवार (ता.२५) पासून हरभरा खरेदी बंद आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon
Published on
Updated on

Chana Market Update : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत यंदा (२०२२-२३) हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी हिंगोली जिल्ह्याला दिलेले ४ लाख ३१ हजार १९० क्विंटलचे उद्दिष्ट संपल्याने मंगळवार (ता. २५) पासून खरेदी बंद आहे.

राज्य शासनाने ९५ हजार ९८५ क्विंटल वाढीव उद्दिष्ट प्राप्त झाले असून आदेशानंतर पुढील आठवड्यात खरेदी सुरु होईल. परभणी जिल्ह्यासाठी ५ लाख ६३ हजार १०२ क्विंटलचे उद्दिष्ट अद्याप शिल्लक आहे अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Chana Rate
Chana Procurement : अखेर हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविले

हिंगोली जिल्ह्याला दिलेले ४ लाख ३१ हजारांवर १९० क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे मंगळवार (ता.२५) पासून हरभरा खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार शासनाने वाढीव ९५ हजार ९८५ क्विंटलचे उद्दिष्ट दिले आहे.

त्यानुसार खरेदीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मंगळवार (ता. ३) पासून हिंगोली जिल्ह्यात हरभरा खरेदी सुरु होईल असे सूत्रांनी सांगितले

Chana Rate
Chana, Soybean Market : मका, हळद, हरभरा, सोयाबीनमध्ये उतरता कल

३४ कोटी २३ लाखावर चुकारे अदा....

दरम्यान, गुरुवार (ता. २७) पर्यंत राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी-हिंगोली जिल्ह्यातील १७ केंद्रांवर ११ हजार ७७३ शेतकऱ्यांकडून १ लाख ८५ हजार ३६० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

त्यात परभणी जिल्ह्यातील ५ हजार ५८९ शेतकऱ्यांचा ८८ हजार ४०३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार १८४ शेतकऱ्यांच्या ९६ हजार ९५७ क्विंटल हरभऱ्याचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रावरील ४६ हजार ९२९ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ८ केंद्रावरील ५० हजार ५२९ क्विंटल असा एकूण ९७ हजार ४५८ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे.

त्यापैकी १५ केंद्रांवरील ६४ हजार १७१ क्विंटल हरभऱ्याचे ३ हजार ८७८ शेतकऱ्यांना ३४ कोटी २३ लाख ५४ हजार ४१९ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com