Chana Market : हरभऱ्याचे १११ कोटी‌ २४ लाख रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा

Chana Procurement : हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रावर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी ७ हजार ५६८ शेतकऱ्यांचा १ लाख १६ हजार ४२२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.
Chana Market
Chana Market Agrowon
Published on
Updated on

Parbhani Chana News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ (मार्क.फेड.) अंतर्गत १७ खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्री केलेल्यांपैकी गुरुवार (ता.१) अखेर १३ हजार ३४४ शेतकऱ्यांना २ लाख ८५ हजार ५१९ क्विंटल हरभऱ्याचे १११ कोटी २४ लाख ५१ हजार ५३२ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) यावर्षीच्या (२०२२-२३) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत १७ केंद्रावर गुरुवार (ता.१) अखेर १६ हजार ४९३ शेतकऱ्यांचा २ लाख ५५ हजार ६८८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आला आहे.

Chana Market
Chana Market Rate : हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच

या हरभऱ्याची एकूण किंमत १३६ कोटी ४० लाख ९ हजार ८०० रुपये होते.त्यात परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रावर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ८ हजार ९२५ शेतकऱ्यांचा १ लाख ३९ हजार २६५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यत आला. त्याची किंमत ७४ कोटी २९ लाख ८० हजार ६४२ रुपये आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रावर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी ७ हजार ५६८ शेतकऱ्यांचा १ लाख १६ हजार ४२२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.या हरभऱ्याची एकूण किंमत ६२ कोटी ६२ लाख १५ हजार १५७ रुपये होते.

१११ कोटी २४ लाखावर चुकारे अदा...

परभणी जिल्ह्यातील केंद्रावर खरेदी केलेल्यांपैकी १ लाख २१ हजार ६५३ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला. आजवर ६ हजार ९२८ शेतकऱ्यांना १ लाख १२ हजार ६०५ क्विंटल हरभऱ्याचे ६० कोटी ७ लाख ४७ हजार ६७५ रुपये एवढे चुकारे अदा करण्यात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com