मराठवाड्यातील ६० पैकी २८ कारखान्यांचे गाळप थांबले

३ कोटी १७ लाख टन उसाचे गाळप, ३ कोटी १६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
Sugar Mill
Sugar MillAgrowon

औरंगाबाद: शिल्लक उसाचा (Surplus Sugarcane) प्रश्न चांगलाच ऐरणीवर असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ६० कारखान्यांपैकी २८ कारखान्यांनी (Sugar Mill) आपला यंदाचा गाळप हंगाम (Crushing Season) आटोपता घेतला आहे. दरम्यान, २३ मे पर्यंत सर्व कारखान्यांनी रेकॉर्ड ३ कोटी १७ लाख १० हजार १७६ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करत ३ कोटी १६ लाख ९७ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. ३२ कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच आहे.

Sugar Mill
घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

उस्मानाबादमधील कारखान्यांनी ७० लाख २१ हजार ९४९ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.६० टक्के साखर उताऱ्याने ६७ लाख ३९ हजार ८६४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी २८ लाख २७ हजार ७३३ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४५ टक्के साखर उताऱ्यांने २९ लाख ५३ हजार ७१६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील कारखान्यांनी २७ लाख ४७ हजार ४४६ टन उसाचे गाळप करत २९ लाख १ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.५८ टक्के राहिला. बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी ४५ लाख ९९ हजार २१० टन उसाचे गाळप करत सरासरी ८.७१ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख ६ हजार ७९० क्विंटल साखर उत्पादन केले.

परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी ४० लाख १४ हजार १५ टन उसाचे गाळप करताना सरासरी १०.३५ टक्के साखर उताऱ्याने ४१ लाख ५२ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी २१ लाख ४३ हजार २२८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.५५ टक्के साखर उताऱ्याने २२ लाख ६० हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन केले. नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांनी २५ लाख ३० हजार २८२ टन उसाचे गाळप करत २४ लाख ७६ हजार ८१० क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.७९ टक्के राहिला. लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ५८ लाख २६ हजार ३१३ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.६५ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ६ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

हे आहेत आठ जिल्ह्यातील कारखाने

यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या ६० कारखान्यांमध्ये उस्मानाबादमधील १४, औरंगाबादमधील ७, जालन्यातील ५, बीडमधील ७, परभणीतील ६, हिंगोलीतील ५,नांदेडमधील ६ व लातूरमधील १० कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांपैकी उस्मानाबादमधील १०, औरंगाबाद व परभणीतील प्रत्येकी २, जालन्यातील १, हिंगोलीतील ४, नांदेडमधील ६ व लातूरमधील ३ मिळून २८ कारखान्यांनी आपला ऊस गाळप हंगाम थांबविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com