Nano Liquid Urea: नॅनो युरीयाला शेतकऱ्यांची मोठी पसंती

२०२५ अखेरीस ८ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून वर्षाकाठी ४४ कोटी बाटल्या बाहेर पडतील. ज्या पारंपरिक २०० लाख मेट्रिक टन युरियाची (Conventional Urea) गरज भरून काढतील, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
Nano Liquid Urea
Nano Liquid UreaAgrowon
Published on
Updated on

(वृत्तसंस्था)
शेतकऱ्यांकडून नॅनो युरियाला (Nano Urea) मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याचे बुधवारी केंद्रीय खते, रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. नॅनो युरियाच्या ३९० लाख बाटल्या देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आल्या आहेत, त्यातील २८७ लाख बाटल्या या ऑगस्ट २०२१ ते जून २०२२ दरम्यान विकल्या गेल्याचे मांडवीय म्हणाले.

मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी नॅनो युरियाची (Nano Urea) विश्वासाहर्ता वाढत असून २०२५ नंतर देशाला युरियाची आयात करण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. वर्षभरातील युरियाची गरज ही पारंपरिक युरियाचे उत्पादन आणि नॅनो लिक्विड युरियाच्या (Nano Liquid Urea) माध्यमातून भागवली जाईल.

नॅनो लिक्विड युरियाच्या (Nano Liquid Urea) चाचण्या दरम्यान नॅनो युरियाच्या वापरामुळे उत्पादनात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे सिद्ध झाले. १ ऑगस्ट २०२१ पासून नॅनो लिक्विड युरियाचे व्यावसायिक उत्पादन होत असून पूर्वीपेक्षा आता उत्पादनात वाढ झाली असल्याचेही मांडवीय यांनी सांगितले.

केंद्रीय खते व रसायन मंत्रालयाच्या माहितीनुसार, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) या दोन सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांनी इफ्कोसोबत (IFFCO) गोपनीयतेचा व सांमजस्य करार केला आहे. या करारानुसार नॅनो युरियाचे तंत्रज्ञान या सरकारी मालकीच्या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात येणार असून या निर्णयामुळे नॅनो युरियाचे उत्पादन वाढणार आहे.

२०२५ अखेरीस ८ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून वर्षाकाठी ४४ कोटी बाटल्या बाहेर पडतील. ज्या पारंपरिक २०० लाख मेट्रिक टन युरियाची (Conventional Urea) गरज भरून काढतील, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

पारंपारिक युरियाची (Conventional Urea) गरज नॅनो लिक्विड युरियाने भरून काढल्यास सरकारला वर्षाकाठी ४० हजार कोटींचे परकीय चलन वाचवणे शक्य होईल, असा अंदाज केंद्रीय खते व रसायन मंत्रालयाने व्यक्त केला. २०२३-२०२४ नंतर भारताला युरिया आयातीची (Urea Import) गरज भासणार नसल्याची शक्यताही या मंत्रालयाने व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com