Cow Urine: छत्तीसगड सरकार करणार गोमूत्राचीही खरेदी

मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. पशुपालकांना गोमुत्रासाठी (Cow Urine) प्रति लिटर किमान ४ रुपये देण्याचा तर प्रस्ताव विचाराधीन आहे.
Cow Urine
Cow UrineAgrowon
Published on
Updated on

छत्तीसगडमधील पशुपालकांना उत्पन्नाचे आणखी एक साधन मिळणार आहे, कारण आता राज्य सरकार (Chhattisgarh government) त्यांच्या शेणासोबतच गोमुत्राचीही खरेदी करणार आहे. या गोमुत्राचा वापर कीड नियंत्रक (pest control) उत्पादने बनवण्यासाठी करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दरात खते, कीड नियंत्रक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. पशुपालकांना गोमुत्रासाठी प्रति लिटर किमान ४ रुपये देण्याचा तर प्रस्ताव विचाराधीन आहे.

Cow Urine
Dairy Sector: डेअरी क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थकारणास चालना: नरेंद्र मोदी

दुर्ग जिल्ह्यातील खरसा या गावात होणाऱ्या 'हरेली' या स्थानिक उत्सवापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रायपूर जिल्ह्यातील गोशाळांमधून गोमुत्राची सरकारी खरेदी सुरु होणार आहे.

छत्तीसगड सरकारकडून राज्यात गोधन न्याय योजना (Godhan Nyay Yojana) राबवण्यात येते. या योजने अंतर्गत सरकार पशुपालकांकडून शेणाची खरेदी करते. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक मदत होते. या शेणाचा वापर सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी केला जातो. हेच खत शेतकरी सेंद्रिय पद्धतीने लागवड करताना वापरतात. गोधन न्याय योजने अंतर्गत पशुपालकांना शेणासाठी २ रुपये किलो असा दर दिला जातो.

Cow Urine
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

सरकारच्या या योजनेला पशुपालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारने आता शेणासोबतच गोमूत्राचीही खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले. खरेदी केलेल्या गोमूत्रापासून सरकार कीड नियंत्रक उत्पादनांसोबतच 'जीवामृत' सारखी उत्पादने बनवणार असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

सरकार शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर अवलंबन कमी करण्याचे आवाहन करत आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दरात सेंद्रिय खते, कीड नियंत्रक उत्पादने उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Cow Urine
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

मागच्या दोन वर्षांत सरकारने १५० कोटी रुपयांचे शेण खरेदी केले असून बचत गटांनी २० लाख क्विंटल गांडूळखताची निर्मिती केलेली आहे. त्यापासून कंपोस्ट खतांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com