
नेदरलँडच्या मदतीने केरळ सरकार वायनाडमध्ये 'क्लायमेट स्मार्ट कॉफी'ची संकल्पना राबवण्याच्या शक्यता आजमावून पाहणार आहे. त्यासाठी नेदरलँड येथील 'एनएल वर्क्स' हा अभ्यास गट या संकल्पनेतील तांत्रिक, व्यावसायिक व्यवहार्यता तपासणार आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर येथील सामाजिक आणि पर्यावरण व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात? याचाही अभ्यास केला जाणार आहे.
या अभ्यासगटाच्या चाचपणीनंतर नेदरलँडप्रमाणेच वायनाडमध्ये क्लायमेट स्मार्ट कॉफीचे (Climate Smart Coffee) उत्पादन घेतले जाणार आहे. क्लायमेट स्मार्ट म्हणजेच पर्यावरण अनुकूल कॉफीचे रोपण केले जाणार आहे. या रोपांच्या लागवडीमुळे हवामान बदलात घट होते. हवामान अनुकूलता आणि जैवविविधतेचे संरक्षण होते. याशिवाय कॉफी उत्पादकांच्या उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव यांनी ही माहिती दिली आहे. राजीव यांनी या अभ्यास गटासोबत याबाबतची चर्चा केली आहे. वायनाड व परिसरातील दीर्घकाळ पर्यावरणाची शाश्वतता, कॉफी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पनातील वाढ या मुद्यांना प्राधान्यक्रम देत या अभ्यासगटाकडून चाचपणी करण्यात येणार आहे.
हा अभ्यासगट वायनाडमध्ये स्थानिक प्रशासन, शिक्षण, पर्यावरण आणि उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून प्रायोगिक स्वरूपात कॉफी फार्म (Model coffee farm) उभारणार आहे. निर्यातक्षम कॉफी उत्पादनासाठी वायनाड येथे एक कॉफी पार्क (Coffee Park) उभारण्याचा केरळ सरकारचा प्रयत्न असल्याचे राजीव म्हणाले आहेत.
नेदरलँडमधील कॉफी आणि मसाला कंपन्यांनी केरळमधील क्लायमेट स्मार्ट कॉफी (Climate Smart Coffee), मसाला उत्पादन क्षेत्रात रस दाखवला आहे. एनएल वर्क्स हा अभ्यासगट त्यात समन्वयाची भूमिका पार पडेल. केरळमध्ये अशी हवामान अनुकूल उत्पादने घेतली जातील, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास राजीव यांनी व्यक्त केला आहे.
जुलै २०२१ मध्येच भारतीय आणि नेदरलँडच्या कंपन्यांनी परस्पर सहकार्याने केरळमध्ये क्लायमेट स्मार्ट कॉफीची संकल्पना राबवण्यासाठी सहमती दर्शवली होती, असेही राजीव यांनी नमूद केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.