Cotton Market : जगात आपला कापूस खरचं महाग आहे का ?

कापसावरील आयातशुल्क कमी केल्यास आयात स्वस्त पडेल. तर दुसरीकडे निर्यातीसाठी अनुदानाचीही मागणी उद्योगाने केली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

पुणेः देशातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) दबावात आहेत. आता तर देशातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा स्वस्त झाले. त्यामुळं भारतातून कापूस निर्यातही (Cotton Export) वाढल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

मात्र तरीही कापड उद्योगानं (Textile industry) भारतातले भाव जास्त असल्याचे सांगत आयातशुल्क काढण्याची मागणी लावून धरली. पण असं सांगताना प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दराची तुलना केली जात नाही.

तर वायद्यांशी (Futures Market) तुलना केली जाते. खर तर आता भारतातील कापूस आंतरराष्ट्रीय दरापेक्षा स्वस्त झाला. 

केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामण विविध उद्योगांच्या शिष्टमंडळांच्या भेटी घेत आहेत.

उद्योगाच्या अर्थसंकल्पाकडून आशा आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. कापड उद्योगानं अर्थमंत्र्यांकडे कापसावरील आयातशुल्क रदद् करण्याची मागणी केली.

कापड उद्योगाच्या मते देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळं देशातील उद्योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करणं शक्य होत नाही.

कापसावरील आयातशुल्क कमी केल्यास आयात स्वस्त पडेल. तर दुसरीकडे निर्यातीसाठी अनुदानाचीही मागणी उद्योगाने केली.

तुलना कशी व्हायला हवी?

पण कापड उद्योग म्हणतो तसं, देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा खरचं जास्त आहेत का? चला तर समजून घेऊ… सर्वात आधी कापूस दराची तुलना करताना देशातील प्रत्यक्ष खरेदीचे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांतील दराचा आढावा घेतला जातो.

बरं वायदे मार्च महिन्यातील आहे. त्यामुळं सहाजिकच पुढील तीन महिन्यांतील वायद्यांचे दर कमीच असणार. पण प्रत्यक्ष खरेदीचा दर जास्त असतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्यक्ष खरेदीचा दर काॅटलूक ए इंडेक्सवरून कळतो. काॅटलूक ए इंडेक्स जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमधील रुईचा प्रत्यक्ष दर दर्शवतो.

Cotton Market
Cotton Market : कापूस निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार का?

काय आहे दराची तुलनात्मक स्थिती?

देशात सध्या कापूस खंडीचे भाव सरासरी ६१ हजार ५०० रुपयांवर आहेत. एक खंडी ३५६ किलोची असते. क्विंटलमध्ये रुईचा भाव १७ हजार २७५ रुपये होतो.

तर काॅटलूक ए इंडेक्स काल १०१.६५ सेंट प्रतिपाऊंड होता. म्हणजेच क्विंटलमध्ये रुईचा भाव १८ हजार १६६ रुपये होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कापसाचा भाव देशातील भावापेक्षा ८९१ रुपयांनी जास्त आहे.

वायद्यांशी तुलना चुकीची

उद्योग आणि व्यापाऱ्यांकडून तुलना करताना वायद्यांमधील दराशी केली जाते. आज दुपारी ४ वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८७ सेंट म्हणजेच १५ हजार ६४७ रुपये आहेत.

देशातील वायद्यांशी आंतरराष्ट्रीय वायद्यांची तुलना केली तर समजू शकतो. पण तिकडचा वायद्यातील भाव आणि आपला प्रत्यक्ष खरेदीचा भाव, अशी तुलना केली जाते.

आयातशुल्क काढण्याची शक्यता कमीच

प्रत्यक्ष खरेदीचा विचार केला तर आज देशातील कापूस स्वस्त पडतो. शेतकऱ्यांचे कापसाचे भाव आधीच कमी झाले आहेत. वाढलेली आवक आणि खाद्यतेलामुळे सरकीचे दबावात आलेले दर यामुळे कापसावर दबाव आला.

त्यातच उद्योगांकडून आयातशुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. पण सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. सरकारने यापूर्वी दोनदा ही मागणी फेटाळली.

पॅनिक सेलिंग टाळावे

मागील आठवड्यापासून बाजारातील कापूस आवक वाढली. यापुर्वी कापसाची आवक दैनंदीन एक लाख गाठींच्या दरम्यान होती. ती आता दीड ते दोन लाख गाठींच्या दरम्यान पोचली.

त्यामुळेही बाजारात कापूस दरावर आणखी दबाव आहे. कापूस आवक वाढल्याने सरकीचेही दर नरमले आहेत.

Cotton Market
Cotton Market : कापूस निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार का?

आजही कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. पण कापसाचे भाव कायमच दबावात राहणार नाहीत.

पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढतील. त्यामुळे शक्य असलेल्या शेतकऱ्यांनी थांबावे. कापसाचे पॅनिक सेलिंग टाळावे आणि टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com