Wheat Market : गव्हाच्या दरात सुधारणा; सरकारच्या खरेदीचा परिणाम

Wheat Rate : सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील गहू उत्पादन यंदा १ हजार १२७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.
Wheat Market
Wheat MarketAgrowon

Wheat Arrival Update : देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये गव्हाचे भाव जवळपास ३ टक्क्यांनी वाढले आहेत. अनेक बाजारात आता गव्हाचे भाव २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले.

गव्हाचे भाव वाढल्याने यंदाही सरकारची गहू खरेदी उद्दीष्टापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील गहू उत्पादन यंदा १ हजार १२७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा यंदा उत्पादनात वाढ झाली. पण असे असतानाही गव्हाच्या भावात वाढ झाली.

खुल्या बाजारात गव्हाचे भाव वाढल्याने सरकारची खेरदी मात्र कमी होत आहे. सरकारला आतापर्यंत केवळ २६२ लाख टन गहू खरेदी करता आला. यापैकी १२५ लाख टन गहू पंजाबमध्ये तर ९६ लाख टन गहू मध्य प्रदेशात आणि ६३ लाख टन गहू हरियानात खरेदी करण्यात आला.

Wheat Market
Wheat Market Rate : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही?

सरकारने देशातील गहू उत्पादनाचा अंदाज वाढवला. सरकारच्या मते देशात यंदा १ हजार १२७ लाख टन गहू उत्पादन झाले. गेल्याहंगामातील उत्पादन १ हजार ७७ लाख टनांवर स्थिरावले होते. म्हणजेच यंदा गहू उत्पादनात ५० लाख टनांनी वाढ झाली.

पण सरकारच्या अंदाजविषयी व्यापारी आणि संस्थांनी असमती दर्शवली. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा खरचं उत्पादन वाढले असते तर सरकारला गहू खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले असते. उत्पादनात वाढ झाली तर सरकारला ३४५ लाख टन गहू खरेदी का करता आला नाही? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

काही व्यापारी तर देशातील यंदाचे गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षाही कमी राहील, असा अंदाज व्यक्त करत आहेत. काहींच्या मते देशात १ हजार ४० लाख टनांवर उत्पादन स्थिरावेस. तर सरकारला यंदा २६३ लाख टनांपेक्षा जास्त खरेदी करता येणार नाही. कारण खुल्या बाजारात गव्हाचे भाव वाढत असल्यामुळे शेतकरी माल मागे ठवत आहेत.

बाजारातील गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात स्टाॅकमधील गहू बाजारात आणला. त्यामुळे सरकारकडील बफर स्टाॅक कमी होता. पण नव्या हंगामातील गहू खरेदीनंतर सरकारकडे सध्या २९० लाख टन गव्हाचा स्टाॅक आहे. हा स्टाॅक २००८ नंतर सर्वात कमी आहे. तर तांदळाचा स्टाॅक सहा वर्षातील निचांकी पातळीवर येऊन ५५५ लाख टनांवर आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com