Wheat Market Rate : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही?

Wheat Bajarbhav : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले.
Wheat Market
Wheat MarketAgrowon

Wheat Market Update : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. पण आतापर्यंत केवळ २५९ लाख टनाचीच खरेदी करता आली. त्यामुळे सरकारला यंदाही खरेदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

नाफेडने देशभरात आतापर्यंत २५९ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता. परिणामी बाजारात गव्हाच्या दरात तेजी आली होती. गहू दराने विक्रमी टप्पा गाठला होता.

सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. यासह अनेक निर्णय घेतले. स्टॉक मधील गहू खुल्या बाजारात विकला. यामुळे ऐन गहू अवकेच्या हंगामात दर दबावात आले.

Wheat Market
Wheat Procurement : सरकारची गहू खरेदी ४१ टक्क्यांनी वाढली

नवा गहू बाजारात येणाच्या काळात खुल्या बाजारात गव्हाचे भाव प्रतिक्विंटल १९०० ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते. त्यामुळे यंदाही सरकारला एक वर्षपुर्वीच्या खेरदीचा टप्पा गाठला येणार नव्हता. यंदाही सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. कारण महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये दरात वाढ झाली आहे.

यंदा नाफेडने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. सरकारला आतापर्यंत २५९ लाख टन खरेदी करता आली. तर यंदा सरकारची खरेदी २६० ते २७० लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सरकारला हरियाणात आतापर्यंत 6 लाख 29 हजार टन खरेदी करता आला. मागील हंगामात याच काळातील खरेदी 4 लाख टन होती.म्हणजेच हरयाणातील गहू खरेदी 55 टक्क्यांनी वाढली. पण हरियाणात केवळ 1339 टन गहू एफएक्यू दर्जाचा होता. उर्वरित गहू सरकारने नियम शिथिल केल्यानंतर खरेदी झाला.

तर पंजाबमध्ये यंदा गहू खरेदीत 26 टक्क्यांची वाढ झाली. मागील हंगामात पंजाबमध्ये 9 लाख तणांची खरेदी झाली होती. ती यंदा 12 लाख टनांवर पोचली. मध्य प्रदेश मधील खरेदी यंदा 68 टक्क्यांनी वाढली. मध्य प्रदेशात आतापर्यंत 7 लाख टनाची खरेदी झाली. मागील हंगामात 4 लाख टन गहू खरेदी केला होता.

सरकारने यंदा देशात १ हजार १२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. पण पावसाने गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गहू उत्पादन सरकारच्या अंदाजपेक्षा कमीच राहील, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच सरकारकडे मागणी हंगामातील शिल्लक साठा खूपच कमी आहे. गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव पुढील काळात तेजीत येऊ शकतात, असा अंदाज गाहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com