केंद्राकडून ६९.२४ लाख टन गव्हाची खरेदी

केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार १७ एप्रिलपर्यंत सरकारने ६९.२७ लाख टन गहू हमीभावाने (MSP) खरेदी केला आहे. या सरकारी खरेदीचा लाभ ५.८६ लाख शेतकऱ्यांना झाला असून त्यांच्या बँक खात्यांत १३,९५१.४१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

केंद्र सरकारने या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ६९.२४ लाख टन गहू (Wheat) खरेदी केला आहे. हमीभावाने (MSP) खरेदी करण्यात आलेल्या या गव्हापोटी १४ हजार कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे.

रब्बी विपणन हंगाम २०२२-२०२३ साठी सध्या मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड येथे गव्हाची हमीभावाने (MSP) खरेदी सुरु आहे.

Wheat Procurement
यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होणार!

एप्रिल ते मार्च दरम्यान रब्बी विपणन हंगाम सुरु असतो. मात्र एप्रिल ते जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat procurement) केली जाते. केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार १७ एप्रिलपर्यंत सरकारने ६९.२७ लाख टन गहू हमीभावाने (MSP) खरेदी केला आहे. या सरकारी खरेदीचा लाभ ५.८६ लाख शेतकऱ्यांना झाला असून त्यांच्या बँक खात्यांत १३,९५१.४१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

Wheat Procurement
पंजाबमधील गव्हाची २० टक्के प्रत खालावली

केंद्र सरकारने यंदा गव्हाला २०१५ रूपये प्रति क्विंटल असा हमीभाव (MSP) जाहीर केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या या हंगामातील आतापर्यंतच्या गहू खरेदीपैकी ३२,१६,६६८ टन गहू पंजाबमधून (Punjab) खरेदी करण्यात आला आहे. हरियाणातून (Haryana) २७,७६,४९६ टन, मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) ८,९८,६७९ टन गहू खरेदी करण्यात आला आहे.

२०२०-२०२२ सालातल्या खरीप विपणन हंगामातील भातपिकाची खरेदी (Paddy Procurement) सुरु असून शेतकऱ्यांना हमीभावाचा (MSP) लाभ दिला जात असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Wheat Procurement
हे वर्ष खाद्यान्न महागाईचेच !

खरीप विपणन हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबरदरम्यान सुरु असतो. १७ एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून ७५४.०८ लाख टन भातपिकाची (खरीपातील ७५०.९५ लाख टन आणि रब्बीतील ३.१४ लाख टन) हमीभावाने खरेदी केली आहे. आजवर १ कोटी ८ लाख शेतकऱ्यांना १,४७,८०० कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com