जिल्हा बॅंकांनी चार हजार कोटींचे कर्ज वाटलेच नाही

दहा बॅंकांचे कर्जवाटप ८० टक्क्यांपेक्षा कमी; सात लाख शेतकरी वंचित
Solapur District Bank
Solapur District BankAgrowon

सोलापूर : राज्यातील (State) जवळपास ६७ लाख शेतकऱ्यांना (Farmer) २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात (Rabi and Kharif seasons) २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज (Crop Loan) वाटप करावे, असे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने दिले होते. परंतु ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी (Bank) ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप (Loan) केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना (farmer) विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना बॅंकांकडून पीककर्ज (Crop Loan) मिळू शकले नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) खासगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, शेतीच्या (farm) प्रगतीसाठी हातभार लागावा या हेतूने राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडून दरवर्षी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जवाटप करणे अपेक्षित असते. मात्र बॅंकांकडून कर्ज (Bank Loan) घेऊन कर्जमाफीची वाट पाहणारे बरेच शेतकरी आहेत. दुसरीकडे प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील शेतकऱ्यांना (Farmer) अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर बॅंकांनी कर्जवाटप करताना हात आखडता घेतल्याची स्थिती आहे. तरीही, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास त्यांच्या अडचणी दूर होतील या हेतूने राज्य सहकारी बॅंकेकडून अर्थसाह्य केले जाते.

Solapur District Bank
‘सीएससी’, बॅंकेकडून विमा काढताना शेतकऱ्यांची लूट

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी (Economical Year) राज्य बॅंकेने मुंबई, ठाणे, वर्धा जिल्हा बॅंक वगळता २८ जिल्हा बॅंकांना आठ हजार ८९२ कोटींचे कर्ज मंजूर केले. त्यानुसार २२ जिल्हा बॅंकांनी जवळपास सात हजार कोटींचे कर्ज घेतले. तरीही, सांगली, जळगाव, ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलडाणा, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्हा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची बाब राज्य बॅंकेकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. आता राज्य सरकारने तीन लाखांपर्यंचे कर्ज बिनव्याजी केले, पण बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

शेती कर्जाची स्थिती (२०२१-२२)
राज्य बॅंकेकडून वितरित कर्ज
६९२८.२२ कोटी


खरीप-रब्बीसाठीचे टार्गेट
२०,५८४.१९ कोटी


जिल्हा बॅंकांकडून कर्ज वितरित
१६,९४२ कोटी

कर्जवाटप न केलेली रक्कम
३,६४२.१९ कोटी

सोलापूर जिल्हा बँक राज्यात अव्वल (Solapur District Bank State )
राज्यातील ३१ पैकी पाच जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात (District Bank Farmer Kharif and Rabi Season) १०० टक्क्यांपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. सोलापूर जिल्हा बॅंक राज्यात अव्वल ठरली असून विशेष म्हणजे १०० वर्षांची जुनी बॅंक अडचणीत आल्याने सध्या बॅंकेवर (Bank) प्रशासक आहे. दुसरीकडे धुळे, नांदेड, सातारा, रायगड, भंडारा या बॅंकांचे कर्जवाटप (Bank Loan ) १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. पुणे, जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया या बॅंकांचे (Bank) कर्जवाटपही ९० टक्क्यांहून अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com