अनिल जाधव
पुणेः चालू आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton rate) सुधारणा पाहयला मिळाली.
कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील दर काहीसे वाढले होते. तर चीनसह इतर देशांकडून कापसाला मागणी (Cotton) वाढत आहे. भारतातूनही निर्यात सुरु झाली.
उद्योगांचा कापूस वापरही वाढत आहे. त्यामुळे कापसाचे दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील दरपातळी वाढलेली होती. या पातळीपेक्षा बाजार तुटला नाही.
चीनकडून वाढलेली मागणी आणि इतर देशांची खेरदी यामुळं कापूस दर तेजीत असल्याचं सांगितलं जातं. सोमवारी वायदे ८४.७९ सेंट प्रतिपाऊंडवर सुरु झाले.
रुपयात हा दर १५ हजार ४३७ रुपये प्रतिक्विंटल होतो. वायद्यांमध्ये कच्च्या कापसाचे नाही तर रुईचे व्यवहार होतात. म्हणजेच हे दर रुईचे आहेत.
मंगळवारी आठवड्यातील निचांकी आणि उचांकी दर पाहायला मिळाला. वायदे ८३.२१ सेंटवर सुरु झाले आणि उच्चांकी ८६.७२ सेंटचा टप्पा गाठला होता.
म्हणजेच मंगळवारी बाजार १५ हजार १६० रुपयांवर सुरु झाला आणि उच्चांकी १५ हजार ७८८ रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. मात्र हे दर टिकले नाही.
दरात चढ उतार होत गेले. शुक्रवारी वायदे ८५.३४ सेंटवर बंद झाले. रुपयात हा भाव १५ हजार ५३७ रुपये होतो. म्हणजेच आठवडाभरात वायद्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा झाली.
प्रत्यक्ष खेरदीचे दर तेजीतच
आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्सही या आठवड्यात कमी जास्त झाला होता.
मात्र सरासरी पातळी कायम होती. या आठवड्यात काॅटलूक ए इंडेक्स १०० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान राहीला.
देशातील कापूस बाजार
देशातील कापूस बाजार या आठवड्यात स्थिर राहीला. सोमवारी कापसाचा सरासरी भाव ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांवर सुरु झाला होता.
हा भाव आठवड्याच्या शेवटीही कायम राहीला. तर सरकीचे भावही सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ४०० ते ३ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. खंडीचे भावही ६१ हजार ते ६२ हजार रुपयांच्या दरम्यान राहीले.
बाजाराला पोषक स्थिती
चालू आठवड्यात कापसाचे भाव टिकून होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा पाहायला मिळाला.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली. चीनसह इतर देशांची आयात सुरु झाली आहे. भारतातूनही बांगलादेशला निर्यात सुरु झाली. देशातील उद्योग ९० टक्के क्षमतेने सुरु झाले. त्यामुळं कापसाचा वापर वाढला.
निर्यातीसाठी मागणी वाढली. तर सोमवारी कापसाचे वायदे सुरु होणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.