Soybean Market : बंपर सोयाबीन उत्पादनानंतरही ब्राझील फायद्यात?

अर्जेंटीनात यंदा दुष्काळ पडला. सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझील १९९८ नंतर, म्हणजेच २५ वर्षानंतर सोयापेंड निर्यातीत अर्जेंटीनाला यंदा मागं टाकणार आहे.
Soybean Market
Soybean Marketagrowon

Soybean Rate : अर्जेंटीनात यंदा दुष्काळ पडला. सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझील १९९८ नंतर, म्हणजेच २५ वर्षानंतर सोयापेंड निर्यातीत अर्जेंटीनाला यंदा मागं टाकणार आहे.

दुसरीकडं अर्जेंटीनातील शेतकरी चांगल्या भावाच्या आशेनं सोयाबीन मागं ठेवत आहेत. परिणामी अर्जेंटीनाची सोयाबीन आयात यंदा वाढणार आहे.

आपल्याला माहितच आहे, की सोयाबीन उत्पादनात ब्राझील जगात पहिल्या तर अर्जेंटीना तिसऱ्या क्रमांकावर असतो. ब्राझील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असला तरी गाळप कमी होतं. ब्राझीलमध्ये सोयाबीन गाळपाची क्षमता विकसित झाली नाही.

त्यामुळं ब्राझील थेट सोयाबीनचीच निर्यात करतो. चीन हा ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक. चीन ब्राझीलमधून सोयाबीन आयात करतो गाळप करून सोयापेंड आणि तेल काढतो.

दुसरीकडं अर्जेंटीनात मात्र सोयाबीन गाळप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं अर्जेंटीना सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर असतो.

Soybean Market
Co-operative Societies : संगमनेरमध्ये सहकारी संस्थामुळे शेतकरी कुटुंबात समृद्धी : थोरात

यंदा मात्र समिकरण बदललं. अर्जेंटीनात मागील ६० वर्षांतील भयानक दुष्काळ पडला. त्यामुळं सोयाबीन उत्पादन निम्म्यानं घटलं. यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन २५० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केलं. असं झाल्यास अर्जेंटीनाचं हे उत्पादन २३ वर्षांतील निचांकी असेल.

तर सोयाबीन गाळप २० वर्षांतील निचांकी होऊन २८० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज आहे. यातून २०९ लाख टन सोयापेंड मिळेल. यापैकी २०० लाख टन निर्यात होईल, असा अंदाज ब्राझीलमधील काही संस्थांनी व्यक्त केला.

ब्राझीलमधील रोसारिओ ग्रेन्स एक्सचेंजच्या मते, यंदा ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १ हजार ५३० लाख टनांवर पोचेल. तर गाळप ५२७ लाख टनांचं होईल. यापासून ४०८ लाख टन सोयापेंड मिळेल.

ब्राझील सोयापेंड उत्पादनाचा हा आकडा पहिल्यांदा गाठणार आहे. त्यामुळं निर्यातही वाढेल. एक्सचेंजच्या मते ब्राझील यंदा २११ लाख टन सोयापेंड निर्यात करेल.

मागील २५ वर्षांपासून सोयापेंड निर्यातीत आघाडीवर असलेला अर्जेंटीनाची निर्यात यंदा २०० लाख टनांवरच स्थिरावेल. तर ब्राझीलची निर्यात २११ लाख टनांवर पोचेल. म्हणजेच यंदा ब्राझील सोयापेंड निर्यातीत अर्जेंटीनाला पछाडेल. पण अनेक देशांना ब्राझीलमधून सोयापेंड आयातीत काही अडचणी आहेत, त्यामुळंच सोयापेंडचे दर सुधारतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Soybean Market
Kisan Long March : राज्यभरातील शेतकरी काढणार अकोले ते लोणी ‘लाँग मार्च’

मागील आठवड्यापासून सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली. त्यामुळं मागील दोन महिन्यांपासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीही वाढवली. मागील तीन दिवसांमध्ये अनेक बाजारांमध्ये सोयाबीन आवक वाढली. त्यामुळं दरही काहीसे स्थिरावले. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

अर्जेंटीनातील उत्पादन घटल्यामुळं भारतालाही काही संधी निर्माण झाल्या. ब्राझीलमधून सोयापेंड निर्यात वाढणार असली तरी, भारत आणि शेजारच्या देशांना निर्यात करण्यासाठी उशीर होतो. शिपमेंट्स पोचण्यास दीड ते दीन महिने लागतात.

यामुळं आशियातील देश भारतीय सोयापेंडला पसंती देतात. यंदा भारतातून सोयापेंड निर्यात दुप्पट झाली. पुढील काळातही भारतीय सोयापेंडला मागणी कायम राहील. खाद्यतेलाच्या दरातही सुधारणा होतेय. त्यामुळं सोयाबीनचे दर सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com