Co-operative Societies : संगमनेरमध्ये सहकारी संस्थामुळे शेतकरी कुटुंबात समृद्धी : थोरात

शेतकऱ्यांच्या मदतीमुळे सहकार टिकवता येत आहे. संगमनेर साखर कारखाना कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratAgrowon

Nagar News : ‘‘शेतकऱ्यांच्या मदतीमुळे सहकार टिकवता येत आहे. संगमनेर साखर कारखाना कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन (Sugarcane Production) वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था, कारखाना यामुळे तालुक्यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे,’’ असे मत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी व्यक्‍त केले.

संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा बुधवारी (ता. २९) आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

Balasaheb Thorat
Bhausaheb Thorat Sugar Mill: भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गाळपाची उद्या सांगता

थोरात म्हणाले, ‘‘संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याने या वर्षी अनेक अडचणीवर मात करून १० लाख मेट्रिक टनांवर उसाचे गाळप केले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते. परंतु सरकार बदलल्याने काम मंदावले, परंतु पाणी येणार आहे.’’

या वेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजित खेमनर, संपतराव गोडगे, अभिजित ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, मंदा वाघ, रामदास वाघ, संभाजी वाघचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

४ कोटी २१ लाखांचा वेतन फरक

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून वेतन फरक ४ कोटी २१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा बुधवारच्या (ता. २९) कार्यक्रमात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com