Brazil Soybean Export : ब्राझीलची सोयाबीन निर्यात ९७० लाख टनांवर पोचणार

Soybean Production : ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन २०२२-२३ मध्ये १ हजार ५६० लाख टनांवर पाचेल. तर सोयाबीनची निर्यात ९७० लाख टनांची निर्यात होण्याचा अंदाज आहे.
Brazil Soybean Export
Brazil Soybean ExportAgrowon

Soybean Rate Update : ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन २०२२-२३ मध्ये १ हजार ५६० लाख टनांवर पाचेल. तर सोयाबीनची निर्यात ९७० लाख टनांची निर्यात होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन आणि निर्यात दोन्ही विक्रमी पातळीवर राहील, असे ब्राझीलच्या वनस्पती तेल उद्योगाने म्हटले आहे.

द ब्राझीलीयन असोसिएशन ऑफ व्हेजिटेबल ऑईल इंडस्ट्रीजने याबाबतचा अंदाज दिला आहे. ब्राझीलने मे महिन्यात ९५७ लाख टन सोयाबीन निर्यातीचा अंदाज होता. तर सुधारित अंदाज वाढ करण्यात आली.

ब्राझीलमधील उद्योगांनी नुकतेच जाहीर केलेल्या अंदाजात ९७० लाख टन सोयाबीन निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला. मागील हंगामात ७८७ लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती. म्हणजेच यंदा सोयाबीन निर्यातीत २३.२ टक्क्यांची वाढ होणार आहे.

उद्योगाच्या मते, ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन यंदा २० टक्क्यांनी वाढले आहे. ब्राझीलमधील उत्पादन यंदा १ हजार ५६० लाख टनांवर पोचले. आधीच्या अंदाजाच्या तुलनेत १० लाख टनांची वाढ करण्यात. यापुर्वी १ हजार ५५० लाख टनांवर होता.

Brazil Soybean Export
Soybean Market : हिंगोलीत सोयाबीनला ४७०० ते ५१०० रुपयांचा दर

२०२१-२२ च्या हंगामात १ हजार २९९ लाख टन उत्पादन झाले होते. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी ५३२ लाख टन सोयाबीन गाळप होईल, असाही अंदाज आहे. सोयाबीन गाळप गेल्यावर्षीच्या तुलनेत साडेचार टक्क्यांनी वाढले. गेल्या हंगामात ५०९ लाख टन सोयाबीन गाळप झाले होते.

जानेवारी ते एप्रिल या काळात ब्राझीलमध्ये १६६ लाख टन सोयाबीन गाळप झाले होते. गेल्यावर्षी याच काळातील गाळप १६१ लाख टन होते. म्हजणचे यंदा गाळपात साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.

गेल्या हंगामातील शिल्लक साठा ३९ लाख टन होता. तो यंदा ७६ लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. तर सोयापेंड उत्पादन ४०७ लाख लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात ३९२ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा जवळपास चार टक्के वाढ झाली.

ब्राझीलमध्ये यंदा सोयापेंड उत्पादन वाढल्याने निर्यातही वाढण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात २०३ लाख टनांची निर्यात झाली होती. ती यंदा २१९ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सोयापेंड निर्यात जळपास ८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

ब्राझीलमध्ये मागील हंगामात ९९ लाख टन सोयातेलाचे उत्पादन केले होते. त्यापैकी २६ लाख टनांची निर्यात केली होती. तर यंदा १०७ लाख टन सोयातेल उत्पादनाचा अंदाज आहे. तर निर्यात २३ लाख टन होण्याची शक्यता उद्योगांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com