Hingoli Soybean Market : हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) मंगळवारी (ता. २७) सोयाबीनची १२५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला किमान ४७०० ते कमाल ५१०० रुपये आणि सरासरी ४९०० रुपये दर मिळाले.
हिंगोली धान्य बाजारात २१ ते २७ जून या कालावधीत सोयाबीनची ३६३९ क्विंटल आवक झाली. सरासरी ४९७५ ते ५१२० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २६) सोयाबीनची ४९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८८० ते कमाल ५१९० रुपये तर सरासरी ५०३५ रुपये दर मिळाले.
शनिवारी (ता. २४) सोयाबीनची ११५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५२५० रुपये तर सरासरी ५१२० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २३) सोयाबीनची ६९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१७५ रुपये तर सरासरी ४९८७ रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. २२) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१५५ रुपये तर सरासरी ४९७७ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २१) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१५० रुपये तर सरासरी ४९७५ रुपये दर मिळाले.
हिंगोली धान्य बाजारात तीन चार आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी चढउतार होत असून दरात फारशी सुधारणा नाही. त्यात पेरणीचे दिवस असल्यामुळे आवकदेखील कमी झाली आहे. दर वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून घरातच आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.