Chicken Rate : महाराष्ट्रासह देशात चिकनच्या दरात वाढ

अमरावतीत दर २६० रुपये किलो
Chicken Rate
Chicken RateAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : सहा महिन्यांपूर्वी बाजारात कमी असलेले दर त्यासोबतच उन्हाळ्यात पक्ष्यांच्या वजनात अपेक्षित वाढ होत नसल्यामुळे सध्या बाजारात कोंबड्यांची आवक (Poultry Arrival) कमी आणि मागणी अधिक अशी स्थिती आहे. परिणामी बाजारात रविवारी (ता. २८) चिकनचे दर (Chicken Rate) २६० रुपये किलोवर पोहोचले.

राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या नऊ लाखांच्या घरात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिकनचे दर दबावात असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाई करणेदेखील पोल्ट्री व्यावसायिकांना शक्य होत नव्हते.

राज्यात अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून करारावर पोल्ट्री व्यवसाय करतात. मात्र करारदार कंपन्यांकडून बाजारात अधिक वजनांचा पक्षी विक्रीसाठी पाठविण्यात असल्याने बाजारातील मालाची विक्री होईस्तोवर शेतकऱ्यांकडे मालाची उचल होत नाही. त्यामुळेदेखील बाजारात स्थिरता आली होती.

Chicken Rate
राज्यात चिकनच्या प्रतिकिलो दरात सुधारणा

८५ रुपये उत्पादकता खर्च असताना ७५ ते ८० रुपये किलोप्रमाणे चिकनची विक्री करण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली होती.

गेले सहा महिने अशी स्थिती असल्यामुळे अनेकांनी उत्पादन कमी केले. आता उन्हाळ्यात ५० टक्के मागणी आणि ३० ते ४० टक्के उत्पादन अशी विरोधाभासी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे दरात सुधारणा अनुभवली जात आहे. सध्या अमरावती बाजारपेठेत २६० रुपये किलो असा दर चिकनला मिळाला. येत्या काळाच चिकनचे दर तीनशे रुपये किलोवर जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Chicken Rate
चिकनच्या मागणीत हलकी वाढ; दरात सुधारणा 

उन्हाळ्यात तापमानामुळे पक्ष्यांचे वजनदेखील जास्त वाढत नाही, असे पक्षी खाण्यासाठी चविष्ट राहतात. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठानेदेखील संशोधनाअंती हा दावा केला आहे. सध्या बाजारात दोन किलो १०० ग्रॅम, दोन किलो ३०० ग्रॅम अशा वजनाचे पक्षी येत आहेत. त्या कारणामुळेदेखील खवय्यांची मागणी वाढली आहे.

पंजाबमध्ये शनिवारी (ता. २७) एक किलो ८० ग्रॅम वजनाचे पक्षी बाजारात दाखल झाले. दिल्लीमध्ये दोन किलो २० ग्रॅमचे पक्षी होते. नाशिकमध्ये एक किलो ८० ग्रॅम तर पुण्यात दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे पक्षी बाजारात दाखल झाले.

तमिळनाडूमध्ये दोन किलो ३०० ग्रॅम वजनाचा पक्षी उपलब्ध होत आहे. अशा पक्ष्यांना सध्या राज्यनिहाय वेगवेगळे दर मिळत आहेत.

पंजाबमध्ये जिवंत कोंबडीचे दर ११५ रुपये, हरियानात १०८, हिमाचल प्रदेशमध्ये ११५, मध्य प्रदेशमध्ये १३२, राजस्तान ११२, आसाम १४३, गुजरात १३२, नाशिक १२३, पुणे १२०, मिरज १२२, तेलंगणा १२६ तर केरळ १२४ रुपये याप्रमाणे घाऊक दर होते.

अधिक वजनाचा पक्षी खाण्यासाठी योग्य नसतो. त्याचे मास रबराप्रमाणे लागते, असा दावा संशोधनाअंती महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने केला आहे. आता तापमानात वाढ झाल्याने पक्ष्यांचे वजन वाढविणे अवघड होते.

परिणामी कमी वजनाचे पक्षी बाजारात येत असल्याने त्याला मागणी आहे. त्यातच उत्पादकता कमी आणि मागणी अधिक हेदेखील कारण दरवाढी मागे आहे.

सध्या २६० रुपये किलो चिकनला दर असून येत्या काळात ते तीनशे रुपयांवर पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.
- अतुल पेरसपुरे, पदाधिकारी, अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com