Shri Lanka Crisis:श्रीलंकेतील अस्थिरता भारतीय चहा उद्योगाला कारक

सीटीसी डस्टच्या विक्रीचा आकडा ९ लाख ४४ हजार ४५२ किलोंवर होता. तेंव्हापासून विक्रीत घट दिसून आली. असे असले तरीही सीटीसी डस्टच्या किंमतीत ३ ते ५ रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यातील सरासरी किमतीत (१२१ रुपये) ६ रुपयांची वाढ झाली.
Indian Tea
Indian TeaAgrowon

कोची : श्रीलंकेतील राजकीय अस्थिरता भारतातील चहा उद्योग क्षेत्रासाठी इष्टापत्ती ठरत आहे. श्रीलंकेतील अस्थिर वातावरणामुळे श्रीलंकेच्या चहाचा खरेदीदार असलेल्या इराणने भारताकडून खरेदी करणे पसंत केल्याने उत्तर भारतातील चहाच्या किमतीत वाढ झाली. इराणशिवाय तुर्की, रशियातील खरेदीदारही भारतीय चहा खरेदीस पसंती देत आहेत. त्यामुळे आणखी काही काळ भारतीय चहाच्या दरांत तेजी राहण्याची शक्यता आहे.

कोची येथील चहा लिलावात इराणकडून बोली लावण्यात आल्याचे चहा उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. कोलकाता येथील पारंपारिक चहा (orthodox tea) लिलावात चहाला प्रति किलो ३५० ते ४५० रुपये असे वाढीव दर मिळाले. या लिलावात केवळ इराणच नव्हे तुर्की आणि रशियातील व्यापाऱ्यांनीही भारतीय चहा खरेदीस रस घेतल्याचे सूत्रांनी म्हटले.

स्वच्छ काळ्या, अखंड पानांना लिलावात मोठी मागणी राहिली, या चहाला वाढीव दर मिळाला. या चहाच्या विक्रीमूल्यात सरासरी ४ रुपयांची वाढ होऊन दर प्रति किलो १५९ रुपयांवर गेल्याचे लिलाव घेणाऱ्या फोर्ब्स, इवर्ट आणि फिगीस या कंपन्यांनी म्हटले.

अलीकडील काळात ऑर्थोडॉक्स ग्रेडसच्या (Orthodox Grades) किमतीतही वाढ झाली. या वाढीमागे ऑर्थोडॉक्स चहा उत्पादकांनी दुहेरी उत्पादन सुविधांचा अंगीकार केल्याचे कारण दिले आहे. सीटीसी डस्टच्या विक्रीचा आकडा ९ लाख ४४ हजार ४५२ किलोंवर होता. तेंव्हापासून विक्रीत घट दिसून आली. असे असले तरीही सीटीसी डस्टच्या किंमतीत ३ ते ५ रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यातील सरासरी किमतीत (१२१ रुपये) ६ रुपयांची वाढ झाली.

इराण आणि पश्चिम आशियातील खरेदीदार हे दक्षिण आणि उत्तर भारतीय चहा लिलाव केंद्रातील पारंपरिक खरेदीदार आहेत. ऑर्थोडॉक्स आणि सीटीसी चहाच्या वाढत्या किमतीमुळे त्यांनी आपला मोहरा दक्षिण भारतीय ऑर्थोडॉक्स (Orthodox Auction Centers)लिलाव केंद्रांकडे वळवला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

श्रीलंकेतील अस्थिरता हेही भारतीय चहाची मागणी वाढण्यामागचे प्रमुख कारण मानण्यात येते. मात्र भारतातील बहुतांशी लिलाव केंद्रांकडे ऑर्थोडॉक्स ग्रेडसचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. आणखी काही महिने मागणीत वाढ असणार आहे, त्याचा विचार करत भारतातील तीन प्रमुख चहा उत्पादक कंपन्यांनी ऑर्थोडॉक्स ग्रेड्सचे (Orthodox Grades)उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समोर आले.

Indian Tea
शेतकऱ्यांसाठी मॉन्सून आणि सरकारही नॉट रिचेबल

कुन्नूर येथील लिलावात सीटीसी डस्टच्या (CTC Dust) मागणीत घट दिसून आली. ज्यामुळे किमती उतरल्या आणि ऑफर केलेल्या ७५ टक्के माल विकल्या न जाता पडून राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com